आमरण उपोषणकर्ते मा.वसंत कुलसंगे यांना जनसेवा गोंडवाना पार्टीचा भक्कम पाठिंबा.
एस.के.24 तास
गडचिरोली : येथील गोंडवाना विद्यापीठ परिसरात अजुन पर्यंत ” न बांधलेल्या” सभागृहाला कथीत दत्ताजी डिंडोळकर यांचे नावं देवु नये,या मागणी साठी आमरण उपोषणास बसलेले आदरणीय तिरु.वसंतरावजी कुलसंगे यांना भक्कमपणे पाठिंबा देण्यासाठी जनसेवा गोंडवाना पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.अवचितराव सयाम व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.प्रा.धिरज सेडमाके.
आज रात्री 9.13 वा उपोषण मंडपास भेट देवून राष्ट्रीय योध्दा क्रांतीविर बाबुराव पुल्लेसुरबापु सेडमाके यांचा फोटो उपोषण मंडपात ठेवण्याच्या सुचना देवुन उपोषणा दरम्यान मा.वसंतराव कुलसंगेजी यांची प्रकृती उत्तम राहो ही फडापेन चरणी प्रार्थना केली.
सगा समाजातील मान्यवरांनी मंडपास भेट द्यावी ही समाज बांधवांना विनंती केली.