पूर पिडीतांना दिला शोभाताईं फडणविसांनी दिलासा.

पूर पिडीतांना दिला शोभाताईं फडणविसांनी दिलासा.


नितेश मँकलवार!उपसंपादक!एस.के.24 तास


मुल : गत २ वर्षापासून पावसाड्यात निर्माण होणाऱ्या पुर परिस्थितीने भयावह अवस्थेत जगणाऱ्या शहरातील वार्ड क्र.१५ मधील शेकडो परिवारांना अखेर माजी मंञी, शोभाताई फडणविस यांनी दिलासा देऊन स्थाई उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घेण्याचा शब्द दिला.


 वार्ड क्र. १५ मधील पूरपिडीतांना माजी मंञी शोभाताईंनी घरी बोलवून आस्थेने त्यांचे दुख जाणून घेतले.लगेच सा.बा.विभागाचे अधिकारी यांचे शी चर्चा करून  या गंभीर बाबीकडे अगत्याने लक्ष देण्यास व  पावसाळा सुरु होण्यापुवीं  स्थाई उपाययोजना करण्यासाठी  सुचना दिल्या.


गत पावसाड्यात  वार्ड क्र.१५ मध्ये पुर पुर परिस्थितीने महामार्ग लगतच्या परिसरातील अनेक घरांमध्ये अनेकदा पुराचे पाणी घुसल्याने जीवन विस्कडीत झाले.अनारोग्य पसरले.अनेकांचे मोठे नुकसान झाले.मोठी ओरड झाली पण प्रशासनाने सहानुभूती शिवाय कुठलेही ठोस पाऊल उचलले नाही.भविष्यात काय होणार ? 


या भयावह चिंतेतअसलेल्या वार्ड क्र.१५ मधील नागरिकांची भिती शोभाताईंनी हेरली व स्थाई उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घेण्याचा शब्द दिला व मोठा दिलासा दिला आहे.यावेळी वार्ड क्र.१५ मधील अनेक कुटुंब उपस्थित होते.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !