झटापटीत वाघाच्या झुंजीत बिबट मृत. ★ तळोधी वनपरिक्षेत्रातील घटना.

झटापटीत वाघाच्या झुंजीत बिबट मृत. 


★ तळोधी वनपरिक्षेत्रातील घटना.


एस.के.24 तास


नागभीड : तळोदी बाळापुर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या गोविंदपुर क्षेत्रातील, येनोली माल बिट,कक्ष क्रमांक 65, येनूली माल  हद्दीत वाघाचे हमल्यात मादा बिबट्या चे मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली.


तळोधी बा.वनपरिक्षेत्रातील  येनुली माल चे वनरक्षक पि.एम.श्रिरामे हे गस्तीवर असताना सकाळी १०:३० वा. येनोली माल बिट कक्ष क्रमांक 65 येनूली माल  हद्दीत  अंदाजे दिड ते दोन वर्षे वयाची मादा बिबट मृतावस्थेत आढळून आली.
सकाळी घटनास्थळी मोक्का पंचनामा करून मृत बिबट तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या सावरगाव येथील रोपवाटिका मध्ये आणून,शव विच्छेदन करून नंतर जाळण्यात आले. 

 यावेळी पशुधन विकास अधिकारी कु.ममता वानखेडे,नागभीड,तथा पशुधन विकास अधिकारी एस.बी.बनाईत तळोधी बा.यांनी शवविच्छेदन केला, यावेळी मृत बिबट चे काही आंतर अवयवांचे नमुने  गोळा करून ते समोरील तपासणी करण्या करिता पाठवीण्या करीता ठेवण्यात आली.

यावेळी के.आर.धोडने,सहाय्यक वन संरक्षक,वन विभाग ब्रह्मपुरी,एस.बी.हजारे,वनपरिक्षेत्र अधिकारी नागभीड,एक.बी.वाळके क्षेत्र सहाय्यक तळोधी बा.आर.एस‌. गायकवाड क्षेत्र सहाय्यक गोविंदपुर,विवेक करंबेकर मानद वन्यजीव रक्षक ब्रम्हपुरी,यश कायरकर वन्यजीव प्रेमी व अध्यक्ष स्वाब नेचर केअर संस्था,जिवेश सयाम,प्रशांत सहारे, स्वाब संस्था सदस्य,तळोधी बा,वनपरिक्षेत्रातील संपूर्ण वनरक्षक कर्मचारी उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !