जंगली डुकराच्या हल्ल्यात महिला जखमी. ★ कोंडेखल शेतशिवारातील घटना.

 



जंगली डुकराच्या हल्ल्यात महिला जखमी.

कोंडेखल शेतशिवारातील घटना.


सुरेश कन्नमवार!मुख्य संपादक!एस.के.24 तास


सावली : तालुक्यातील कोंडेखल येथील महिला सौ,ललिताबाई सुखदेव कन्नमवार वय,45 वर्ष ही महिला 11:00 वा.कपिल झिंगुजी ठाकूर यांच्या शेतात कापूस काढन्यासाठी गेली होती.जंगल शेताला लागून आहे.दुपारी 3:00 ते 3:30 वा.रानटी रानडुकराने तिच्यावर हल्ला करून डाव्या हाताला छातीवर,कानाला मांडीवर जबर जखमी असल्याने प्रथम उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. हाताला व कानाला मोठी जखम गंभीररीत्या जखमी झाल्याने सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.

आज घटना दिनांक,8/01/2023 रविवार दुपारी 3:00 ते 3: 30 वा.घडली.लपून बसलेल्या जंगली डुकराने कापूस वेचणी करत असताना सौ,ललिताबाई सुखदेव कन्नमवार,वय,45 वर्ष अचानक त्यांच्यावर रानटी डुकराने हल्ला करून गंभीर जखमी केले असून त्यांना गडचिरोलीच्या सामान्य रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.


याची माहिती वनविभागाला दिली असता वन विभागाचे कर्मचारी,वनरक्षक,मुंडे राउंड ऑफिसर,सूर्यवंशी,वन समिती अध्यक्ष,कुमदेव सहारे,उपसरपंच,श्री,नरेश बाबनवाडे,राकेश कंकडालवार,गणेश कन्नमवार,विजय जिगरवार,व वन कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करण्यात आला.

महीलेला लवकरात लवकर वनविभागाकडून आर्थिक मदत देण्याची मागणी गावातील नागरिकाकडून करण्यात येत आहे.तालुक्यात वाघ,बिबट,रानडुक्कर यांच्या हल्ल्यामुळे शेतकरी,शेतमजूर,भयभीत झालेले आहे.त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !