मॅजिक बस इंडिया फाउंडेशन गडचिरोली तथा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जेप्रा व राजगाटा चक या गावात राष्ट्रीय बालिका दिवस साजरा.

मॅजिक बस इंडिया फाउंडेशन गडचिरोली तथा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जेप्रा व राजगाटा चक या गावात राष्ट्रीय बालिका दिवस साजरा.


एस.के.24 तास


गडचिरोली : मॅजिक बस इंडिया फाउंडेशन ही संस्था गडचिरोली जिल्हात मागील दोन वर्षांपासून १२ ते १६  वयोगटातील मुलांसाठी " खेळाच्या माध्यमातून विकास व विषयात्मक शिक्षण " सत्राच्या माध्यमातून हा कार्यक्रम राबवित आहे.या कार्यक्रमाअंतर्गत जीवन कौशल्य - संवाद कौशल्य,संघकार्य, समस्या सोडविणे, शिकण्यातून शिकणे,स्व - व्यवस्थापन व विषयात्मक शिक्षण - संख्या ज्ञान व भाषा ज्ञान आदी क्षेत्रावर काम करीत आहे.


मॅजिक बस इंडिया फाउंडेशन गडचिरोली व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जेप्रा अंतर्गत जेप्रा या गावामध्ये जागतिक कन्या दिवस विविध स्पर्धा घेऊन साजरा करण्यात आला.


यात मुख्य दोन स्पर्धा घेण्यात आल्या. 


1) नाटिका (विषय) मुलींवरील अन्याय अत्याचार आणि मुलींचे अधिकार.


2) रॅली काढण्यात आली.


3) गीतगायन स्पर्धा ( देशभक्तीपर गीत)


या स्पर्धेमध्ये एकूण ६१ मुलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.या कार्यक्रमाचे उद्घाटक श्री. मा.मनोज भांडेकर अध्यक्ष,शाळा व्यवस्थापन समिती जेप्रा अध्यक्ष - श्री.मा.बांबोले  सर मुख्याध्यापक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जेप्रा प्रमुख अतिथी - श्री. मा.भजे सर विषय शिक्षक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जेप्रा.सौ.भैसारे मॅडम विषय शिक्षिका जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जेप्रा सौ.हर्षे मॅडम जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जेप्रा. उपस्थित होत्या. 

  

कार्यक्रमाचे उदेश : - 


 १) मुलींना त्यांचे शिक्षणाचे हक्क माहित व्हावे.

  

२) मुलींवर होणाऱ्या अत्याचारा बदल जागरूकता निर्माण व्हावी.


सदर उपक्रम यशस्वी करण्याकरिता मॅजिक बस संस्थेचे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी मा. प्रशांत लोखंडे सर,यांच्या मार्गदर्शनात व गडचिरोली तालुक्याचे समन्वयक श्री,देवेंद्र हिरापुरे यांच्या सहकार्याने व जीवन कौशल्य शिक्षक श्री. मा लेखाराम हुलके.विषय शिक्षिका कु.रीना बांगरे.यांच्या पुढाकारातून घेण्यात आला.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !