जन शिक्षण संस्थान गडचिरोली येथे सावित्रीबाई फुले जयंती सोहळा संपन्न.

जन शिक्षण संस्थान गडचिरोली येथे सावित्रीबाई फुले जयंती सोहळा संपन्न.



एस.के.24 तास



गडचिरोली : जन शिक्षण संस्थान गडचिरोली येथे भारत सरकार द्वारे कौशल्य विकास कार्यक्रमाचे माध्यमातून संस्थानच्या सभागृहात महिलांच्या शिक्षणाच्या दैवत सावित्रीबाई फुले यांची जयंती सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख म्हणून मा.कबीर यशोदा धर्माजी निकुरे तसेच संस्थेचे कार्यक्रम अधिकारी श्री. गजानन अलोने, जय शिवहरे,श्रेयस चांदेकर तसेच विविध ट्रेड चे ट्रेनर उपस्थित होते.

 तसेच सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणासाठी त्यांनी प्रयत्न करत असताना कशाप्रकारे संकटांना समोर जाऊन स्त्री हि फक्त चूल आणि मूल इतक्याच पूर्ती मर्यादित न राहता स्त्रियांना पुरुषाप्रमाणे दर्जा प्राप्त करून देण्यात त्यांचा महत्वाचा वाटा असल्याचे मत श्री. गजानन अलोने सर यांनी व्यक्त केले. आजच्या काडातल्या महिलांनी सुद्धा सावित्रीबाई फुले  यांच्या प्रेरणेतून इतर महिलांना शिक्षणाकरिता प्रोत्साहित करून स्वतःच्या कुटुंबाला सुशिक्षित करू शकतात असे मत मा. कबीर निकुरे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमात विविध मुलांनी सांकृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला.कार्यक्रमाचे संचालन श्रीमती.काजल चांदेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन कु.मेघा भोयर यांनी केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !