शा.औ.प्र.संस्थेच्या रासेयो विभागाची विशेष सभा संपन्न.
एस.के.24 तास
चंद्रपूर : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाची विशेष सभा कौशल्यम सभागृहात संपन्न झाली.या सभेत संस्थेतील स्वयंसेवक प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते.
दि.२३ ते २५ जानेवारी २०२३ या दरम्यान होत असलेल्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धेची माहिती यावेळी प्रामुख्याने देण्यात आली. सभेला मार्गदर्शक म्हणून मुख्य कार्यक्रम अधिकारी श्री.एन.एन.गेडकर,सहाय्यक कार्यक्रम अधिकारी बी.आर.बोढेकर यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन,रासेयो समिती सदस्य श्री.महेश नाडमवार यांनी केले.प्रास्ताविक रासेयो समिती सदस्य रमेश रोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन गटनिदेशक सौ.झाडे यांनी केले.
कार्यक्रमास निदेशक श्री.अभय घटे,श्री.खेडेकर, कोठारकर,सौ.हेलवडे,सौ.गोर्लेवार आदींची उपस्थिती होती.यावेळी सर्वानुमते खालील प्रतिनिधींची निवड करण्यात आली. निवड झालेले विद्यार्थी प्रतिनिधी श्री. हर्षल बडोले,श्री.दीपक उरकुडे,कु.कोमल बावरे, कु.रिया पिपरीकर या चारही विद्यार्थी प्रतिनिधींचे संस्थेचे प्राचार्य रवींद्र मेहेंदळे यांनी अभिनंदन केले आहे.