माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन सोहळा उत्साहात साजरा.
★ अड्याळ येथिल विवेकानंद विद्या भवन तथा कला कनिष्ठ महाविद्यालय चा उपक्रम.
राजेंद्र वाढई!उपसंपादक!एस.के.24 तास
पवनी : तालुक्यातील अड्याळ.येथील विवेकानंद विद्याभवन तथा कला कनिष्ठ महाविद्यालया च्या वर्ष 1982 ते 1988 पर्यंतच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन सोहळा 24 जानेवारी रोजी शाळेत उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य विष्णुदास जगनाडे यांच्या हस्ते राजस्थान राज्यातील अलवर येथील ईएसआयसी वैद्यकीय महाविद्याल याचे मायक्रोबायोलॉजी विभाग प्रमुख डॉ.पवन उके यांच्या अध्यक्षतेखाली झाले.
प्रमुख पाहुणे म्हणून फार्मा केमिस्ट्री आरएके युनिव्हर्सिटी यूएईचे विभाग प्रमुख डॉ.भूपेंद्र भोंगाडे,प्रा.नारायण जुवार,विमुक्त घुमंतु जनजाती विकास परिषद भारतीय विदर्भ प्रदेश व अध्यक्ष, किशोर सायगन,संगीता चल्लावार(पोटवार) पोलिस पाटिल टोलेवाही,सुनंदा राऊत(टेंभुर्नै) उपस्थित होते.महाविद्यालयाच्या वर्ग 12 च्या विद्यार्थिनी अमावस्या गजभिये,समीक्षा ठवकर, श्रद्धा ठवकर,आकांक्षा तुंबडे यांनी स्वागत गीत सादर करून पाहुण्यांचे स्वागत केले.प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्रा,सैग कोहपरे यांनी संचालन,संजय ब्राह्मणकर यांनी केले.आभार संदीप अंबादे यांनी मानले.
यावेळी उमेश टेंभुर्णे ,प्रशांत बोदेले,रमेश कोल्हे, देवा शिंगाडे,सुरेश कुबडे,विठ्ठल आकरे,धनु मोहूर्ले,विजय कावळे,प्रल्हाद नगरे,प्रकाश वरटी,राजू रोहनकार,मनोहर काकडे,महादेव गिरडकर, सुरेश जाधव,सीमा लाडे(साखरे),प्रयाग गजभिये,सुगंधा जुवार, पुस्तकाला शिंगाडे,बबन ढवळे,जनार्दन नान्हे,सोंदरा ढवळे,रंजना रेहपाडे,मीना वाडेकर,मंदा शहारे,रजनी शहारे,मंदा मुंगाटे,मनोज रामटेके,चंदा राऊत व सर्व 1982 ते 1988 पर्यंतचे माजी विद्यार्थी उपस्थित होते.