सावली तालुक्यातील विविध ठिकाणी अपघात ; एक ठार,तर ५ जन जखमी.

सावली तालुक्यातील विविध ठिकाणी अपघात ; एक ठार,तर ५ जन जखमी.


सुरेश कन्नमवार!मुख्य संपादक!एस.के.24 तास


सावली : सावली तालुक्यातील विविध ठिकाणी अपघात ; एक ठार,तर ५ जन जखमी.खेडी,मंगरमेंढा, येथील घटना आज दि.२३जाने रोजी कामावरुन गावाकडे परत येणाऱ्या इसमाचा अज्ञात वाहनाच्या धडकेने खेडी फाट्यावर अपघात झाल्याने जागीच मृत्यु झाला,प्रफुल्ल सुरेश मडावी वय,३०.रा.सामदा बुज असे मृत्यकाचे नाव असुन तो आपल्या दुचाकी क्र.MH.33 E 3291 या दुचाकीने आपल्या गावाकडे जात होता.त्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने जागीच मृत्यु झाला.मृतकाचे पश्चात आई वडील,पत्नी ,दोन मुली असा परीवार आहे. 


तर पिक अप ने पल्सर ला.धडक दिल्याने तीघे गंभीर जखमी झाले, त्यात लोकनाथ बाबुराव कुळमेथे(४०)रा भार्दुर्णा ,राजकुमार बाजीराव गेडाम(३०),वासुदेव रामदास सोनुले (५४).तिघेही रा.भार्दुर्णा हे तिन.जखमी आपले काम आटोपुन आपल्या गावाकडे पल्सर.क्र.MH.31BL4683 या दुचाकीने जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या पिक अप क्र.MH34 BZ1568 या चारचाकी वाहनाने धडक दिल्याने तीन इसम गंभीर जखमी झाले असुन त्यांच्या वर ग्रामीण रुग्णांलयात उपचार सुरु आहे.


तर पाथरी पोलीस स्टेशन अंतर्गत आजे नातु आपल्या दुचाकीने आपल्या गावावरुन वाघोली बुट्टी येथे जात असताना चक विरखल गावाजवळ अपघात होऊन.आजे नातु.गंभीर जखमी झाले, जखमीत निखिल रवींद्र मंगर (२६) रा.मंगरमेंढा, मिराबाई मनिराम मंगर (७०) असे जखमीचे नाव असुन,जखमीचा उपचार ग्रामीण रुग्णालय सावली येथे सूरु आहे.


तालुक्यात आज सावली आणि पाथरी पोलीस स्टेशन अंतर्गत झालेल्या अपघातात एक ठार,तर पाच गंभीर जखमी झालेल्या ची नोंद.करण्यात आली, पुढील तपास सुरू आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !