चित्रकला स्पर्धा व परिक्षेवर चर्चा यात विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा. - अविनाश पाल


 

चित्रकला स्पर्धा व परिक्षेवर चर्चा यात विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा. - अविनाश पाल


सुरेश कन्नमवार!मुख्य संपादक!एस.के.24 तास


सावली : तालुक्यातील वर्ग 9 ते 12 च्या विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धा व परिक्षेवर चर्चा यात भाग घेऊन देशाचे पंतप्रधान मा श्री नरेंद्र मोदीजी सन 2018 पासुन परीक्षे पुर्वी परिक्षेवर चर्चा कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांशी संवाद साधुन त्यांच्यावरील परिक्षेचा ताण दुर करण्यासाठी आपले अनुभव व तणाव दूर करण्याचे मार्ग सांगुन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करित आहेत.


या अनुशंगाने चंद्रपूर जिल्हात चित्रकला स्पर्धा दि 24/01/2023 व परिक्षेवर चर्चा कार्यक्रम दि 27/01/2023 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे तरी जिल्ह्यातील व सावली तालुक्यातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या दोन्ही कार्यक्रमात सहभागी व्हावेत असे आवाहन भाजपा तालुका अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा चंद्रपुर चे अविनाश पाल


चित्रकला स्पर्धा चे विषय  : - 


1.जी-20 जागतिक विश्वगुरु बनण्याच्या दुष्टीने भारताची वाटचाल.2.आझादी का अम्रुत महोत्सव.3.सर्जिकल स्ट्रॉईक 4. कोरोना लसिकरण मध्ये भारत नं 5 पंतप्रधानाच्या जनसेवेच्या विविध योजना.6.स्वच्छ भारत अभियान 7.आत्मनिर्भर भारत 8.आंतरराष्ट्रीय योगदिन - मोदिजींनी वेधले जगाचे लक्ष 9. बेटी बचाव बेटी पढाव 10. चुलीतल्या धुराच्या त्रासातून मुक्त महिला - मोदिजींचा संवेदनशील निर्णय यांपैकी कोणत्याही एका विषयाची चित्रकला स्पर्धा द्यावी यात प्राविण्य मिळविणार्रा विद्यार्थ्यांना तालुका स्तरावर प्रथम बक्षीस 5000/- द्वितीय बक्षीस 3000/- तृतीय बक्षीस 2000/- प्रोत्साहनपर 10 बक्षीसे व शिल्ड देण्यात येईल.


या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छित स्पर्धकांनी आपली नावे नोंदणी online पद्धतीने www.parikshapecharcha.online स्पर्धकांनी या लिंकवरुन आँनलाईन नोंदणी करावे असे आवाहन भाजपा तालुका अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा चंद्रपुर चे अविनाश पाल यांनी केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !