गडचिरोली येथे ८ तारखेला रविवारी कविसंमेलनाचे आयोजन.

गडचिरोली येथे ८ तारखेला रविवारी कविसंमेलनाचे आयोजन.


एस.के.24 तास


गडचिरोली : झाडीबोली साहित्य मंडळ गडचिरोली च्या वतीने  रविवारी ८ तारखेला गडचिरोली मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात कविसंमेलनाचे आयोजन केलेले आहे. 

   सदर कार्यक्रम दोन सत्रात पार पडणार असून पहिल्या सत्रात  झाडीबोली मंडळाने पूर्वघोषीत केलेल्या साहित्य  व कलावंत क्षेत्रातील पुरस्काराचे वितरण तसेच आनंदराव बावणे लिखीत "स्वानंदगीत" या पुस्तकाचे प्रकाशन होईल. या पहिल्या सत्राचे  उद्घाटन आमदार डॉ. देवरावजी होळी करतील. यावेळी अध्यक्षस्थानी गडचिरोली जिल्हा  मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष,प्रंचित सावकार पोरेड्डीवार हे असतील.तर प्रमुख अतिथी म्हणून माजी प्राचार्य डॉ.नामदेव कोकोडे ब्रम्हपूरी,ज्येष्ठ साहित्यिक बंडोपंत बोढेकर, उपविभागीय पोलिस अधिकारी गडचिरोली प्रनिल गिल्डा,सत्यसाई संघटनेचे पूर्व महाराष्ट्राचे राज्याध्यक्ष मनीषदादा समर्थ हे भुषवतील. 

 दुपारच्या दुसऱ्या सत्रात कविसंमेलन पार पडणार असून या संमेलनात उपस्थित सर्व कवींना कविता सादर करण्याची संधी मिळणार आहे.या  कविसंमेलनाचे अध्यक्ष कवयित्री ज्योती कावळे,वडसा राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून कवी अरूण झगडकर गोंडपीपरी,कवी एकनाथ बुध्दे विसोरा,गझलकार मिलिंद उमरे  गडचिरोली हे राहतील.या संमेलनात गडचिरोली,चंद्रपूरचे जिल्ह्याचे ३० कवी निमंत्रीत आहेत.

    तरी कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने कवीं, कवयित्री व रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन झाडी बोली साहित्य मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आलेले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !