नागाळा येथे संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी संपन्न.

नागाळा येथे संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी संपन्न.


राजेंद्र वाढई!उपसंपादक!एस.के.24 तास


चंद्रपूर : ‌तालुक्यातील मुल मार्गावर असलेल्या निसर्गरम्य अशा  नागाळा (महादवाडी) गावातील तेली समाज समितीच्या वतीने संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.मुख्य चौकात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगेश समरीत होते तर कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामगीताचार्य  बंडोपंत बोढेकर यांचे हस्ते झाले.तर प्रा.श्रावण बाणासुरे (बल्लारपूर), रूपदास संगत गुरुजी,आशिष देवतळे (बल्लारपूर),विलास मोगरकर देवाडा (खूर्द),ग्रा.पं.सदस्य अर्चना मोहुर्ले,जयश्री घोंगडे,अर्चना टेकाम,श्री गुरुदेव सेवा मंडळाचे बंडोपंत धोडरे,परशुराम टेकाम, पत्रुजी मोहुर्ले, माजी ग्रा.पं.सदस्य सोपानदास भसारकर, माजी पं.स.सदस्य चंद्रकांत धोडरे आदी मान्यवरांची विचारपिठावर उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक वरून धोडरे यांनी केले.  

उपस्थित सर्व अतिथींनी समायोचित विचार व्यक्त केले.सुरुवातीला नागाळा गावातून संताजी जगनाडे महाराजांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा काढण्यात आली.त्यात श्री गुरुदेव सेवा मंडळ कच्चेपार येथील कार्यकर्ते सहभागी झाले होते. तर नागाळा श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ व  शालेय मुलींनी सुंदर  स्वागत गीत सादर केले.सायंकाळी कार्यक्रमानंतर ग्रामस्थांसाठी नगर भोजन आयोजित करण्यात आले.सायंकाळच्या सत्रात  शालेय विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तेली समाजाचे  देवराव धोडरे,भाऊजी धोडरे,संतोष कुकुडकर , जगदीश कुकुडकर,तसेच गावातील सर्व समाज बांधवांनी व इतर कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहकार्य केले.आभारप्रदर्शन शशिकांत धोडरे यांनी केले.सदर उपक्रम सन १९९५ पासून नागाळा येथे नियमितपणे घेण्यात येत आहे.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !