रक्तविर सेनच्या स्थापना दिनानिमित्त नविन संकल्प घेऊन विविध सामाजिक उपक्रम राबविले.

रक्तविर सेनच्या स्थापना दिनानिमित्त नविन संकल्प घेऊन विविध सामाजिक उपक्रम राबविले.


अमरदीप लोखंडे!सहसंपादक!एस.के.24 तास


ब्रम्हपुरी : दिनांक,१९/०१/२३ रक्तदानाच्या क्षेत्रात मोठी क्रांती घडवुन रूग्ण सेवेसाठी तत्पर असणारी संगठना म्हणजेच रक्तविर सेना.

रक्तवीर सेनेच्या तत्परतेने गरजू रुग्णास रक्त देऊन त्याचा जीव वाचविण्यात धडपड करणारी संस्था म्हणजेच रक्तदान फाउंडेशन.या फाउंडेशनची ओळख झपाट्याने वाऱ्यासारखी चारही दिशेला पसरतआहे.ब्रम्हपुरी तालुक्यातच नाही तर हि रक्तदान फाउंडेशन संगठना आपले कार्यक्षेत्र चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, व नागपुर जिल्ह्य बाहेर  वाढविण्यास जोर बांधुन राहिली आहे. 

रक्तवीर सेना फाउंडेशन च्या स्थापना दिनाच्या निमित्याने महापुरुषांच्या विचारधारेला अनुसरून राष्ट्र संतांची भुमी आत्मनुसंधान भु-वैकुंठ अड्याळ टेकडी येथे आयोजित केलेला स्वच्छ्ता अभियान व वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.

देश म्हणे जागा हो,रक्तविर सेनेचा धागा हो... या घोषवाक्याने परिसर दुमदुमून गेला...

रक्तविर सेनेच्या कार्याची दखल घेत स्वच्छ्ता अभियान व वृक्षारोपण कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष सुरज शेंडे,आम आदमी पार्टीचे ब्रम्हपुरी विधानसभा अध्यक्ष,नावेद खान व सल्लागार जावेद बादशाह खान यांनी सहभाग नोंदवुन समाज कार्याचा संकल्प घेतला.

स्वच्छ्ता अभियान व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन तथा नियोजन अध्यक्ष,निहाल ढोरे,उपाध्यक्ष,मायसिंग बावरी यांनी केले.उपक्रमात सचिव,प्रदिप दर्वे,कोषाध्यक्ष,प्रणय ठाकरे, कार्यकारणी सभासद,प्रफुल ढोक,कार्यकारी विशेष सल्लाहगार, उमाकांत मेश्राम,जिल्हा कार्य प्रमुख, प्रज्वल जनबंधु,जिल्हा नियोजन प्रमुख,तुषार भागडकर,तालुका कार्यप्रमुख,स्वप्निल राऊत, सत्यपाल ढोरे,व लोचन राऊत यांचा सहभाग होता.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !