मनुष्याचा लौकिक सेवाभावनेने वाढतो - ग्रामगीताचार्य,बंडोपंत बोढेकर ★ धनोजे कुणबी समाज बांधवांचा स्नेहमिलन सोहळा : गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न.


मनुष्याचा लौकिक सेवाभावनेने वाढतो - ग्रामगीताचार्य,बंडोपंत बोढेकर


★ धनोजे कुणबी समाज बांधवांचा स्नेहमिलन सोहळा : गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न.


एस.के.24 तास


गडचिरोली : मनुष्याचा लौकिक सुंदर दिसण्याने वाढत नसून तो कर्तव्य भावनेने व सेवा वृत्तीनेच  वाढत असतो आणि म्हणून  स्व- विकासा सोबतच आपला जीवन व्यवहार  इतरांच्या  विकासाला पोषक ठरतील या पद्धतीचा असावा,अशा कार्यकृतीने दुर्बलांना निश्चितपणे आधार मिळेल,असे प्रतिपादन ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी येथे केले.  दरवर्षी प्रमाणे यंदाही सेमाना देवस्थान परिसरात  धनोजे कुणबी समाज बहुउद्देशीय संस्थेद्वारा आयोजित स्नेहमिलन मेळाव्यात व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते.‌अध्यक्षस्थानी  संस्थेचे अध्यक्ष नारायणराव जीवतोडे होते.‌


प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या सौ.रेखाताई डोळस,ज्येष्ठ समाजसेवक  शालिग्राम विधाते,धनोजे कुणबी बचतगटाचे सचिव श्री.भास्कर नागपुरे,पुंडलिक ठोंबरे,आदींची   उपस्थिती होती.याप्रसंगी शालिग्राम विधाते म्हणाले की,समाज बांधवांनी शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नये.  उच्च शिक्षणाला विशेष प्राधान्य द्यावे.त्याबरोबर समाजाच्या उन्नतीसाठी आपण सातत्याने झटले पाहिजे, असे विचार मांडले. याप्रसंगी रेखा डोळस म्हणाल्या,महिलांनी आता मागे राहू नये तर बचत गटांच्या माध्यमातून छोटे छोटे पूरक उद्योग सुरू करून आर्थिक प्रगती प्राप्त करायला हवी,याकडे त्यांनी लक्ष वेधले.संस्थेचा लेखाजोखा आपल्या प्रास्ताविकातून प्रा.विलास पारखी यांनी मांडला. मेळाव्याचे सुरेख सूत्रसंचालन प्रा.डाॅ.अविनाश गौरकर यांनी केले तर आभार प्रा.विजयराव कुत्तरमारे यांनी मानले.


 या मेळाव्यात विविध विभागातून सेवानिवृत्त झालेले समाजबांधव श्रीहरी गौरकर,श्रीकांत माटे,दिलीप गौरकर, दत्तात्रय चटप,विनायक बांदुरकर, मधुकरराव विधाते आदींचा अतिथींच्या हस्ते गौरव चिन्ह व शाल ,श्रीफळ देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला.तर  विविध परिक्षांमध्ये गुणवंत ठरलेले विद्यार्थी ग्रेसी देवेंद्र काळे,अजिंक्य विजय कुत्तरमारे,श्रीरंग अविनाश गौरकर,रिद्धी किशोर पाचभाई,अथर्व प्रमोद बोधाने,अभिजीत प्रमोद आसुटकर,वेदांती विलास आसुटकर,स्नेहा युवराज बोढाले,अथर्व देवेंद्र काळे,तेजल चंद्रभान जेनेकर,ओम भास्कर नागपुरे तसेच पिएचडी पदवी प्राप्त सौ.वैशाली सतिश विधाते यांनाही याप्रसंगी स्मृती चिन्ह व ग्रंथ भेट देऊन  सन्मानित करण्यात आले.


दुसऱ्या सत्रात तिळसंक्राती निमित्ताने महिलांनीही एकमेकांना भेटवस्तू देत  विचारांचे आदानप्रदान केले.मेळाव्यात बाळगोपाळ नातवांसह आजी आजोबांनी हजेरी लावली होती,हे विशेष.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !