युवकांनी अध्यात्मातून गावाच्या सर्वांगीन विकासाचा संकल्प कराव. - माजी आमदार सुदर्शन निमकर
एस.के.24 तास
राजुरा : माथरा (ता.राजुरा) येथे आज दिनांक 21 जानेवारी 2023 रोजी सुरु झालेल्या श्री गुरुदेव दत्त सांप्रदायिक मंडळ, माथरा द्वारा आयोजित प. पु. श्री सद्गुरु नामदेव महाराज रोकडे यांच्या पुण्यस्मरणार्थ किर्तन महोत्सव व जाहीर सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रीय कीर्तकार ह.भ.प.पुरुषोत्तम पाटील महाराज बुलढाणा यांनी उपस्थित होते.
हजारो अध्यात्म किर्तन प्रेमी रसिकांना कीर्तनातून मंत्रमुग्ध केले.कार्यक्रमाचे उद्दघाटक भाजपा जिल्हाध्यक्ष मा.देवराव भोंगळे,कार्यक्रमाचे अध्यक्ष क्षेत्रीय महाप्रबंधक मा.जी.पुल्लया,मुख्य अतिथी मा. सुदर्शनजी निमकर माजी आमदार राजुरा,भाजपा जिल्हा महामंत्री,नामदेवराव डाहुले भाजपा तालुकाध्यक्ष,सुनिल ऊरकुडे,सरपंच हरिदास झाडे, वेकोली चे एरीया प्लॅनिंग ऑफिसर पुल्लयाजी, हभप माणिक महाराज रोकडे, हभप दत्ता मसे महाराज,हभप गोहोकार महाराज,तुंबळे महाराज,वासुदेव पा.लांडे,उपसरपंच सौ.शारदा तलांडे,ग्रा.पं.सदस्य मारोती चन्ने,सौ.सोनू ठक,सौ.अल्का वैद्य,रामपूर येथील प्रकाश फुटाणे, दिपक झाडे,कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच हरीदास झाडे यांनी केले. माजी आमदार निमकर यांनी आपल्या मार्गदर्शन पर भाषणात गावातील सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन लोकसहभागातून आपल्या गावाच्या सर्वांगीन विकासाचा या अध्यात्म कार्यक्रमातून संकल्प करावा.
माजी आमदार निमकर यांनी याप्रसंगी "वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे" या संत तुकाराम महाराजांनी शेकडो वर्षापूर्वी विषद केलेल्या अभंगाची आजच्या विज्ञण्यान युगात पर्यावरणासाठी किती गरज आहे हे कोरोना महामारित आपण प्रत्यक्ष अनुभवले आहे असे सांगितले. कीर्तन महोत्सव प्रसंगी अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंचायतराज व ग्रामविकास आघाडीचे संयोजक प्रदिप बोबडे व आभार ह.भ.प दत्ता मसे महाराज यांनी केले.