अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील शिधापत्रिका धारकांना मोफत धान्य.

अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील शिधापत्रिका धारकांना मोफत धान्य.


सुरेश कन्नमवार!मुख्य संपादक!एस.के.24 तास


चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील, वरोरा तालुक्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेच्या शिधापत्रिका धारकांना 1 जानेवारी 2023 पासून 1 वर्षाच्या कालावधीसाठी रास्तभाव दुकानातून मोफत धान्य दिले जाणार आहे. वरोरा तालुक्यातील 10 हजार 62 अंत्योदय शिधापत्रिका व 90 हजार 196 प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना पुढील 1 वर्षाकरीता याचा लाभ होणार आहे.

अंत्योदय कार्डधारकांना प्रतिकार्ड 5 किलो गहू व 30 किलो तांदूळ तर प्राधान्य कुटुंब योजनेच्या कार्डावरील प्रति व्यक्तींना प्रतिव्यक्ती 1 किलो गहू व 4 किलो तांदूळ मोफत वितरीत करण्यात येत आहे. तसेच अंत्योदय कार्ड धारकांना प्रतिकार्ड 1 किलो साखर 20 रु. या दरात उपलब्ध राहील.

तसेच ज्या लाभार्थ्यांनी माहे नोव्हेंबर किंवा डिसेंबर 2022 चे धान्य उचलले नाही,असे लाभार्थी दि.1 जानेवारी,2023 नंतर माहे नोव्हेंबर किंवा डिसेंबर, 2022 चे धान्य उचल करीत असतील तरी ते धान्य मोफत दिले जाणार आहे. याबाबत वरोरा तालुक्यातील सर्व अंत्योदय व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारकांनी नोंद घ्यावी व संबंधित रास्तभाव दुकानातून नियमित धान्याची मोफत उचल करावी, असे वरोराच्या तहसीलदार रोशन मकवाने यांनी कळविले आहे.



#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !