" टाटा मुंबई मैराथान " मध्ये धावणार नवेगाव पांडव ची महिला सरपंचा. ★ राज्यभरातून निवडक १६ महिला सरपंच होणार सहभागी.

" टाटा मुंबई  मैराथान " मध्ये धावणार नवेगाव पांडव ची महिला सरपंचा.


राज्यभरातून निवडक १६ महिला सरपंच होणार सहभागी.


एस.के.24 तास


नागभीड : अत्यंत प्रतिष्टेच्या ' टाटा मुंबई मैराथान " मध्ये राज्यभरातील निवडक २० महिला सरपंचामध्ये जिल्ह्यातील नवेगाव पांडव  ग्रामपंचायतीच्या सरपंचा ऍड.शर्मिला रामटेके यांनी स्थान पटकाविल्याने चंद्रपूर जिल्हाला राज्य भरात मानाचे स्थान लाभले आहे.

मकरसक्रातीच्या शुभ पर्वावर १५ जाने.२०२३ ला देशाच्या आर्थिक राजधानी मुंबई येथे महिला सबलीकरणाचा संदेश दूरवर पोहोचविण्यासाठी  राज्यभरातील निवडक १६ सरपंचा  व महिला पदाधिकाऱ्यांचा प्रतिष्टेची मैराथान आयोजित करण्यात आलेली आहे.

या मैराथान करीता निवडण्यात आलेल्या सर्व १६ महिला सरपंचा यांनी ग्राम पंचायत पातळीवर आपल्या कुशलतेने,कल्पकतेने कारभार सांभाळून पारदर्शकतेने गावांचा विकास साधला आहे.नवेगाव पांडव येशील ग्रामपंचायत सरपंचा ऍड.शर्मिला रामटेके हया दुसऱ्यांदा सरपंच पद सांभाळत आहेत.उच्चशिक्षित असलेल्या ऍड.रामटेके यांनी महिला,विद्यार्थीनी यांचे करीता गावस्तरावर विवीध योजना,उपक्रम राबवून गावाचा नावलौकिक केला आहे.

अनेक सन्मान त्यांनी प्राप्त केले आहेत.राज्यभरातून निवडक १३ महिला सरपंचामध्ये निवड होऊन ऍड. रामटेके आज प्रतिष्टेच्या " टाटा मुंबई मैराथान " मध्ये सहभागी झाल्याने चंद्रपूर जिल्हयासाठी अभिमानाची बाब ठरणार आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !