महाराष्ट्र राज्य हंगामी क्षेत्र कर्मचारी संघटने तर्फे जिल्हा शाखा गडचिरोली च्या वतीने निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्र राज्य हंगामी क्षेत्र कर्मचारी संघटने तर्फे जिल्हा शाखा गडचिरोली च्या वतीने निवेदन देण्यात आले.


एस.के.24 तास


गडचिरोली : दिनांक 21 ऑक्टोबर,२०२२ रोजी महाराष्ट्र शासन,ग्राम विकास विभागाने काढलेल्या परिपत्रकानुसार जिल्हा परिषदांतील आरोग्य विभागाशी संबंधित आरोग्य सेवक,आरोग्य सेविका,प्रयोग शाळा तंत्रज्ञ,औषध निर्माता , आरोग्य पर्यवेक्षक या 5 संवर्गातील रिक्त पदांची जाहिरात दिनांक 1 जानेवारी 2023 ते 7 जानेवारी 2023 पर्यंत प्रसिध्द करणे होते.परंतु आज दिनांक 12 जानेवारी 2023 पर्यत जिल्हा परिषद मधील आरोग्य विभाग मधील 5 संवर्गाची जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही.

 मार्च 2019 मध्ये निघालेल्या जाहिरातीचे पेपर विविध कारणांनी होत नसून ती पदभरती महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभागाने रद्द केली आहे. आणि जिल्हा परिषद मधील आरोग्य विभागातिल 5 संवर्गातिल पदभरतीचा सुधारित कालबद्ध कार्यक्रम प्रसिध्द केला . परंतु दिलेल्या संभाव्य वेळेत जाहिरात प्रसिद्ध करणे आवश्यक परंतु तसे झाले नाही. 

मा.महोदय आपणास नम्र विनंती आहे की,मागिल 4 वर्षापासून या 5 पदांचा अभ्यास करणारे परीक्षार्थी हे निराशामध्ये जात असून मानसिक तणावामध्ये गेलेले आहेत. आधीच 2 वर्ष कोरोना महामारी मुळे गेले.त्यातही परीक्षेच्या दिनांक 3 वेळा जाहीर होऊन ऐन वेळेला रद्द  केल्यामुळे सुशिक्षित बेरोजगार यांच्या मना मध्ये रोष निर्माण होत आहे. 

तरी मा.महोदय आपण जिल्हा परिषद मधील आरोग्य विभाग मधील आरोग्य सेवक,आरोग्य सेविका,प्रयोग शाळा तंत्रज्ञ,औषध निर्माता,आरोग्य पर्यवेक्षक या 5 संवर्गाची जाहिरात लवकरात लवकर प्रसिध्द करून पेपर घेण्यात याव्हे.  निवेदनार्थी महाराष्ट्र राज्य हंगामी क्षेत्र कर्मचारी संघटना जिल्हा शाखा गडचिरोली चे अध्यक्ष ज्ञानदिप भाऊ गलबले,उपाध्यक्ष विलास भाऊ ढोरे, सल्लागार सुनिल तागडे,गडचिरोली तालुका प्रमुख चेतन जेंगठे, प्रसिध्दी प्रमुख सोपान भाऊ म्हशाखेत्री यांनी दिले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !