आदिवासी स्त्रियांनी आपली मुलं घडवावीत. - चित्रा काळमेंगे

आदिवासी स्त्रियांनी आपली मुलं घडवावीत. - चित्रा काळमेंगे


एस.के.24 तास


चिमुर : दिनांक 1 जाने. खेमजई: माझ्या पतीला शिक्षणाने घडवलं. त्यांनी मला घडवलं आणि मी सद्या माझे मुलं घडवत आहे. म्हणून आपल्या जमातीतील स्त्रियांनी स्वतःला व्यसनापासून दूर करावे. आर्थिक बचत करून आपल्या मुलांकडे विशेष लक्ष द्यावे. त्यांना शिक्षणाकडे प्रवृत्त करावे आणि आपल्या मुलांना चांगला नागरिक घडवावं, असे आवाहन महिला मेळाव्याच्या प्रमुख पाहुण्या चित्राताई रवींद्र काळमेघ यांनी केले. दिनांक 1 जानेवारी 2023 रोजी आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटनेच्या वतीने आयोजित नागदिवाळी महोत्सवानिमित्त आयोजित महिला मेळाव्यामध्ये केले.

विदर्भातील माना जमातीचा नागदिवाळी हा प्रमुख उत्सव गावात साजरा करण्यात येत आहे. आज वरोरा तालुक्यातील खेमजई या गावात नागदिवाळी उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्यात येत आहे. या उत्सवाच्या निमित्ताने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला संबोधित करताना चित्राताई काळमेघ यांनी उपस्थित महिलांना उत्तम मार्गदर्शन केले. तसेच शालूताई चौके यांनी उपस्थित महिलांना गाण्याच्या माध्यमातून महिलांना संघटित राहण्यासाठी प्रेरित केले. सोबतच सीमाताई चौके यांनी नागदिवाळीचे महत्त्व समजून सांगत सावित्रीबाईचे स्त्रियांच्या विकासातील योगदान यावर सखोल मार्गदर्शन केले.

तत्पूर्वी नागदिवाळी महोत्सव दरम्यान मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आदर्श शिक्षक तथा आदर्श व्यक्तिमत्व म्हणून सुधाकर चौखे, रवींद्र काळमेंगे, विवेक चौके यांचा गावकऱ्यांच्या वतीने सपत्नीक सन्मान करण्यात आला. सोबतच आदर्श शिक्षक विवेक चौके यांच्या वतीने वाचनसंस्कृती वाढीस लागावी या दृष्टिकोनातून गावातील विद्यार्थ्यांना पुस्तके वितरित करण्यात आले.

या कार्यक्रमाला खेमजई ग्रामपंचायतच्या सरपंच मनीषाताई चौधरी, आदिवासी माना जमात पंचायतीचे प्रमुख भाऊरावजी दडमल, बिरसा विचार मंचाचे अध्यक्ष नथुजी घरत, आदिवासी विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष शत्रुघन शरकुरे व गावकरी तसेच विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !