धनगर समाजाचे शिष्टमंडळ विधानभवनात दाखल ; झाडे कुणबी हटावची मागणी.

धनगर समाजाचे शिष्टमंडळ विधानभवनात दाखल ; झाडे कुणबी हटावची मागणी.


एस.के.24 तास


गडचिरोली -  झाडे कुणबी हे बोगस झाडे चे प्रमाणपत्र घेऊन धनगरावर अतिक्रमण करीत असल्याने त्यांना नोकरीतून बडतर्फ करण्यात यावे व शेळ्या मेंढ्या वनक्षेत्रात चराईस परवानगी द्यावी ही मागणी घेऊन विधानभवन नागपूर येथे लोकप्रतिनिधीची भेट घेत चर्चा केली.

चंद्रपूर - गडचिरोली जिल्ह्यातील झाडे कुनबी, झाडया, झाडी हे धनगर जमातीतील  तत्सम जात "झाडे" या नामसदृश्यतेचा गैरफायदा घेत बोगस जात प्रमाणपत्र मिळवीत शासकीय नोकरी व इतर सुविधांचा लाभ घेत आहेत.  त्यामुळे खऱ्या धनगर जमातीवर अन्याय होत असल्याने त्यांना नोकरीतून बडतर्फ करावे, धनगर समाज मेंढपाळ असल्याने चराईचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे वन क्षेत्रात चराईस परवानगी द्यावी या मागण्या घेऊन धनगर समाजाचे वतीने २६ डिसेंबरला मोर्चा काढण्यात आला. 

२९ डिसेंबरला समाजाच्या शिष्टमंडळाने नागपूर अधिवेशनात दाखल होऊन माजी खासदार डॉ. विकास महात्मे यांच्या माध्यमातून सामाजिक न्याय मंत्री अतुल सावे, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार गोपीचंद पडळकर, काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले, आमदार राम शिंदे यांची भेट घेत चर्चा केली. हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.

 गडचिरोलीचे आमदार डॉ देवराव होळी यांचीही भेट घेत धनगर समाजाच्या विरोधी बाजू घेतल्यास आपल्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला. त्यावेळी धनगर समाजाच्या विरोधात जाणार नाही असे आश्वासन दिले. शिष्टमंडळात डॉ,तुषार मर्लावार,डॉ,नारायण करेवार,विजय कोरेवार, अनिलकुमार ढोले,हरीष खुजे,शरद उरकुडे, कृष्णा गंजेवार, लचमा शिर्गावार, अक्षय पेद्दीवार होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !