30 जानेवारी रोजी जिल्ह्यातील सर्व अनुज्ञप्त्या बंद
एस.के.24 तास
चंद्रपूर : महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूकी करिता शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील अनुज्ञप्त्या 28 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजतापासुन 29 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याबाबत आदेशित करण्यात आले होते. परंतु उच्च न्यायालयाच्या आदेशातील निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाचे 18 व 23 जानेवारीचे सदर आदेश रद्द करण्यात येत आहे.
तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व अनुज्ञप्त्या 30 जानेवारी 2023 रोजी नियमातील तरतुदीनुसार संपूर्ण दिवसभर बंद राहतील याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशात नमूद आहे.