गुरढा येथे ऐतिहासीक धम्म संम्मेलन 29 जानेवारी ला.
नरेंद्र मेश्राम : प्रतिनिधी!एस.के.24 तास
भंडारा : महामानव तथागत गौतम बुध्द व प्रज्ञासुर्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वत : मेणबत्ती प्रमाणे जळुन अंधारात खितपत पडलेल्या कोट्यावधी बहुजनाना ज्ञानाचा प्रकाश दिला. स्वातंञ्य, समता,बंधुता, सामाजिक न्याय मिळवुन दिला.ज्यांच्या प्रकाशाने जिवन उजळुन निघाले,लाचार जीवन स्वाभिमानी झाले.मुके असलेले बोलके झाले,अज्ञानी ज्ञानीवंत झाले.अशा महामानवाच्या विचांराचा अग्नी तेवत ठेवण्यासाठी भव्य एतिहासिक धम्म संम्मेलनाचे आयोजन केले आहे.
हा धम्म संम्मेलन भारतीय बौध्द परिषद सर्कल कनेरी/दगडी ता.लाखनी, जि. भंडाराच्या वतीने हा 49 वा वर्धापन दिनाचा आयोजन दि.29 जानेवारी 2023ला दानशुर स्मृतिशेष शकुंतला अंबादास कान्हेकर यांच्यादान केलेल्या भुमिवर गुरढा येथिल सम्यक बुध्द विहार,समता भुमी येथे आयोजीत करण्यात आले.
सञ पहिलेःसकाळी8वा.धम्मरॅली पुज्य भिक्खु संघ वसर्कलचे कार्यकर्तागण, समता सैनिक दलातील सैनिक उपासक,उपासिका,सकाळी 9.30 वा धम्म ध्वजारोहण भिक्खु संघाचे हस्ते, सकाळी 10.30 वा भिक्खु संघास भोजनदान ,चिवरदान,अष्ठपरिस्कार दान, सकाळी 11 वा.भिक्खु संघाची धम्मदेसणा सञ दुसरे दुपारी1वा.मान्यवरांचे सामाजीक प्रबोधन, अध्यक्षस्थानी अशोक सरस्वती,राष्ट्टिय अध्यक्ष बुध्द विहार समिती नागपुर हे राहतील
तर उदघाटक महेंद्र बारसागडे हे करतील. संम्मेलनाचे मार्गदर्शक विषयःधम्म संस्कुती आणि आंबेडकरवादी समाज डाॅ.प्रकाश राठोड, धम्मसंस्कुृतीच्या ध्येयातील भारत ह्या विषयावर डाॅ.मनोहर नाईक.धम्मक्रांती आणि आजचे वास्तव यावर डाॅ.सर्जनादित्य मनोहर मार्गदर्शन करतील तर इंजि.पि.एस.खोब्रागडे, किशोर घरट, विलास मोहतुरे व किसन मोहतुरे यांच्या प्रमुख उपस्थितित संपन्न होणार.आणि राञिला भिम गितावर आधारीत कव्वालीचा छानदार मुकाबला होणार .तरी सर्कल मधील उपासक,उपासिका यांनी आस्वाद घ्यावा असे भारतीय बौध्द परिषद कनेरी/दगडी च्या पदाधिकारी यांनी पञकाद्वारे कळविले.