कर्मवीर कन्नमवार यांच्या कर्मभूमीत 123 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी. ★ बेलदार समाजानी विविध कार्यक्रम घेऊन दिली आदरांजली.

कर्मवीर कन्नमवार यांच्या कर्मभूमीत 123 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी.


★ बेलदार समाजानी विविध कार्यक्रम घेऊन दिली आदरांजली.


नितेश मँकलवार!उपसंपादक!एस.के.24 तास


मुल : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय मा. सा. कन्नमवार यांची 123 वी जयंती त्यांची कर्मभूमी असलेल्या मुल शहरात मोठ्या उत्साहात बेलदार समाजांनी साजरी केले. 

महाराष्ट्र राज्याचे दुसरे आणी विदर्भाचे पहिले मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांची 10 जानेवारी जयंती असते दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही बेलदार समाज बहुुद्देशिय सेवाभावी संस्था मुल च्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी केल्या जाते. या वर्षी ही नेहमी प्रमाणे त्यांची 123 वी जयंती साजरी करण्यात आली. प्रथम सत्रामध्ये सकाळी 9 च्या वाजताच्या सुमारास मुल शहरात असलेल्या मा सा कन्नमवार सांस्कृतिक सभागृहामध्ये असलेल्या पूर्णाकृती पुतळ्याला बेलदार समाज बांधवांनी माल्यार्पण करून अभिवादन केले. 

दुसऱ्या सत्रामध्ये सभागृहा मध्ये आयोजित जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त मुख्याद्यापक दिलीपराव पुट्टावार तर जेष्ठ समाज बांधव गजाननराव गट्टेवार यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम स्व. दादासाहेब कन्नमवार यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून प्रमुख पाहुण्याचे स्वागत करण्यात आले.त्यानंतर सन 2022-23 मध्ये शासकीय कर्मचारी आपला कार्यकाळ पूर्ण करून सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष डॉ.सुभाषराव रेड्डीवार यांनी केले. बोर्डा बोरकर येथील कन्नमवार सांस्कृतिक सभागृहाची न्यायालयीन लढाई लढणारे केशवराव गिलकीवार यांचा शाल,श्रीफळ आणी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी कन्नमवार यांच्या जीवनावर प्राद्या.मारोतराव पुल्लावार यांनी प्रकाश टाकला. 

त्यानंतर संस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात झाली. एकल डान्स, समूह डान्स ची स्पर्धा घेण्यात आली या मध्ये मुला - मुलींनी आपल्या नृत्याने प्रेक्षकांना मोहित केले. 10 तारखेलाच संघटनेचे सदस्य मारोतराव रामशेट्टीवार यांचा वाढदिवस असतो त्याच्या कडून अल्पोहारचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला संघटनेचे सर्व पदाधिकारी व बेलदार समाज बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !