रहदारीच्या नियमांबाबत सावली पोलिस स्टेशनचे ठाणेदार, आशीष बोरकर यांची कार्यशाळा.
सुरेश कन्नमवार!मुख्य संपादक!एस.के.24 तास
सावली : स्थानिक विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय सावली येथे पोलिस स्टेशनचे ठाणेदार माननीय आशीषजी बोरकर यांनी शिक्षक व विद्यार्थी यांना रहदारीच्या नियमांबाबत कार्यशाळेत मागदर्शन केले.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक मुप्पावार सर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक राऊत सर, सुपले सर, प्यारमवार सर, स्वप्नील चव्हाण, पिदुरकर (पो.स्टे.सावली) उपस्थित होते.