झाडीबोली साहित्य मंडळाचा उत्कृष्ट लोककलावंत पुरस्कार दादा पारधी यांना जाहिर.





झाडीबोली साहित्य मंडळाचा उत्कृष्ट लोककलावंत  पुरस्कार दादा पारधी यांना जाहिर.


एस.के.24 तास


गडचिरोली : झाडीबोली साहित्य मंडळ गडचिरोली जिल्हा शाखेच्या वतीने  दरवर्षी  एका झाडीपट्टी लोककलावंतास पुरस्कार घोषित केल्या जाते. त्यासाठी इच्छूक लोककलावंताना मंडळाकडे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते.  आलेल्या प्रवेशिका मधून निवड समितीने उत्कृष्ट झाडीपट्टी लोककलावंत पुरस्कारासाठी ज्येष्ठ लोककलावंत श्री. दादा अंताराम पारधी (मालडोंगरी) यांची निवड करण्यात आली आहे . सदर पुरस्काराचे वितरण लवकरच गडचिरोली येथे होणाऱ्या विदर्भस्तरीय खुल्या कवीसंमेलनात करण्यात येणार आहे.श्री.दादा पारधी सध्या 81 वर्षांचे असून त्यांनी आपल्या आयुष्याचे 35 वर्षे जनप्रबोधनाच्या  कार्यात घालविले आहे. त्यांनी झाडीपट्टी प्रदेशात निष्काम भावनेने सेवा दिलेली आहे.नकला,खडीगंमत,दंडार,नाट्य च्या माध्यमातून त्यांनी मनोरंजनातून लोकप्रबोधन प्रभावीपणे केलेले आहे. तसेच  त्यांनी शासनाच्या साक्षरता अभियान, लोकसंख्या नियंत्रण कार्यक्रम, आधुनिक शेती, निसर्गोपचार, श्री गुरुदेव आत्मानुसंधान भूवैकुंठ अड्याळ टेकडी च्या कार्यांत  आपल्या परीने योगदान दिलेले आहे. 


कर्मयोगी संत श्रीतुकारामदादा गीताचार्य यांचा पावन सहवास त्यांना लाभला आहे.श्री.पारधी यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना यापूर्वी घुग्घुस येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनात विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.नुकतीच मंडळाची महत्त्वाची सभा जिल्हा प्रमुख डॉ.चंद्रकांत लेनगुरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.  त्याप्रसंगी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर,जिल्हा उपाध्यक्ष प्रा. विनायक धानोरकर,प्रसिद्ध गायक पुरूषोत्तम ठाकरे, उपेंद्र रोहणकर,सहसचिव संजीव बोरकर,सौ.लेनगुरे यांची उपस्थिती होती.सभेचे कार्य नियोजन  संजीव बोरकर यांनी केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !