वैनगंगा नदीच्या तीरावर भिमा (कोरेगाव) शौर्य दिन.
एस.के.24 तास
सावली : ऑल इंडिया शेड्युल्ड कॉस्ट फेडरेशन व गगन मलिक फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने भिमा कोरेगाव शौर्य दिन सलामी महोत्सव १ व २ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित केला आहे. हा महोत्सव गडचिरोली मार्गावरील वैनगंगा नदी तीरावरच्या व्याहाड पुलाजवळ होणार आहे.
महोत्सवात मुख्य मार्गदर्शक म्हणून सिनेअभिनेते गगन मलिक, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ऑल इंडिया शेड्युल्ड कॉस्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष विनय बांबोळे,स्वागताध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते गोपाल रायपुरे,तसेच पिरीपा चे जिल्हाध्यक्ष मुनीश्वर बोरकर,आदि उपस्थित राहणार आहेत.तसेच प्रमुख उपस्थिती मध्ये तेलंगणाचे नियोजन मंत्री बि.विनोदकुमार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन होणार आहे,तर अतिथी म्हणून हरियाणाचे भगीरथमल खनकवाल,उत्तर प्रदेशातील सुनीलकुमार गाजियाबादी, दिल्लीचे पुरणचंद गौतम,माजी जि.प.सदस्य एड.राम मेश्राम,शांताराम उंदिरवाडे,यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या महोत्सवात अष्टधातू २२२ बुद्धमूर्ती प्रतिमांचे वितरण तथा सत्कार, समाज प्रबोधन व भिम गीत तसेच स्मृतिशेष डॉ. अर्जुनदास बिके लिखित चलो बुद्ध की ओर हि नाटिका सादर करण्यात येणार आहे आणि सावित्रीबाई फुले महिला संच खालवस पेठ यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम, अशा विविध आकर्षक कार्यक्रमाचे आयोजक किशोर उंदिरवाडे,लोमेश सोरते,राहुल रायपुरे,पंडित मेश्राम,दिलीप गोवर्धन,यांनी सदर महोत्सवात बौद्ध बांधवांनी जास्तीत जास्त संख्यने उपस्थित राहण्याचे आव्हान केले आहे.