चकपिरंजी ग्रामपंचायत कार्यालयावर स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेसाठी धडक मोर्चा.

चकपिरंजी ग्रामपंचायत कार्यालयावर  स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेसाठी धडक मोर्चा.


सुरेश कन्नमवार!मुख्य संपादक!एस.के.24 तास



सावली : बोथली प्रादेशिक पाणीपुरवठा योजना २००७मध्ये कार्यान्वित करण्यात आली,सदर योजनेत बोथली,चकपिरंजी,मालपिरंजी, केशरवाही,चिचबोडी,राजोली फाल,राजोली चक,हिरापुर आदी गावांचा समावेश होता,या योजनेला पंधरा वर्षाचा कालावधी लोटुन गेला.असला तरी या गावातील पाण्याची समस्या जेसेथे,कधी दोन,तीन दिवस आड पाणी पुरवठा केल्या जात असल्याने चकपिरंजी येथील गावकरी पाण्याच्या बिकट समस्येला.त्रासुन चकपिरंजी येथे स्वतंत्र पाणीपुरवठा योजना द्या.या मागणी साठी गावकरी एकवटले आणि ग्रामपंचायत प्रशासनाला.याविषयीचे निवेदन दिले.




या वेळी  प्रफुल निरूडवार (सामाजिक युवा कार्यकर्ते),सुनील कोवे,विलास चौधरी,वासुदेव मांदाळे, नेहरु चौधरी,पुंडलिक गुरुनले,तुकडोजी शेंडे,मुर्लीधर चौधरी,नामदेव तिवाडे,जगन भैसारे, दिवाकर मंगर,जयकुमार लाडे,देविदास वाटघुरे, वासुदेव नागापुरे,अनिल बावणे,सुवर्णा भैसारे पिंकी साखरे अल्क गावले आदी उपस्थित होते.

मौजा चकपिरंजी येथे ,प्रादेशिक पाणीपुरवठा योजने द्वारे पिण्याचे पाणी नळाद्वारे दिल्या जाते, परंतु या गावात गेली अनेक वर्षांपासून पाणी समस्या आहे ,आतातर एक वर्षापासून १५ मिनिटेही बरोबर पाणी पुरवठा केल्या जात नाही,असा आरोप करीत गावक-यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदन दिले.आणि स्वतंत्र पाणीपुरवठा योजना गावात.देण्याची मागणी केली.या गावात बोरवेल,विहिरी आहेत परंतु बोरवेल बंद,तर विहिरीचे पाणी पिण्यास अयोग्य त्यामुळे नळाचे पाणी तरी मुबलक मिळेल या आशेने आता पर्यंत गावकरी काही आरोप न करता चुप्प होते.परंतु.मागील वर्षांपासून पिण्यासाठीही बरोबर पाणी मिळत नसल्याचे गावकरी हैरान झाले.याविषयी निवेदन दिले.


याविषयी ग्रामपंचायत प्रशासनाने सुध्दा निवेदनाची दखल घेत जिल्हा परिषद कडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !