पुर्व विदर्भ ओबीसी कार्यकर्ता मेळाव्यात चिमूर विधानसभा मतदारसंघातून शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते जाणार.

पुर्व विदर्भ ओबीसी कार्यकर्ता मेळाव्यात चिमूर विधानसभा मतदारसंघातून शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते जाणार.



राजेंद्र वाढई!कार्यकारी संपादक!एस.के.24 तास



 चंद्रपूर : पुर्व विदर्भ काँग्रेस ओबीसी विभागाच्या वतीने आवाज ओबीसी चा कार्यकर्ता मेळावा जवाहर वस्तीगृह सभागृह, सिव्हिल लाइन्स नागपूर येथे २४ डिसेंबर २०२३ ला सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक राष्ट्रीय अध्यक्ष अ.भा.काँग्रेस कमेटी,ओबीसी विभाग मा.कॅप्टन अभय जी यादव,अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना भाऊ पटोले, प्रमुख अतिथी महाराष्ट्र प्रदेश ओबीसी विभाग प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी,खासदार बाळूभाऊ धानोरकर,माजी मंत्री सुनील केदार,माजी मंत्री विजय वडेट्टीवार, आमदार विकास भाऊ ठाकरे,आमदार अभिजित वंजारी,डाॅ.बबनराव तायवाडे,आमदार रणजित कांबळे,आमदार सुभाष जी धोटे, माजी मंत्री राजेन्द्र मुळक,आमदार प्रतिभा ताई धानोरकर, यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे. 


ओबीसी समाजाचे राजकीय व सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सरकारच्या वतीने लक्ष वेधण्यासाठी पुर्व विदर्भातील ओबीसी चा महा मेळावा चे आयोजन करण्यात आले आहे. चिमूर विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र प्रदेश संघटक ओबीसी विभाग धनराज भाऊ मुंगले यांच्या नेतृत्वाखाली नागभीड ,चिमूर , ब्रम्हपुरी, सिंदेवाही तालुक्यातील ओबीसी बांधव कार्यकर्ता व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान नागभीड ओबीसी तालुका अध्यक्ष संजय अगडे यांनी केले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !