सायकल स्नेही मंडळाचे जनजागृतीचे कार्य अविरत सुरू ठेवा - बोढेकर दादा


सायकल स्नेही मंडळाचे जनजागृतीचे  कार्य अविरत सुरू ठेवा  - बोढेकर दादा 


एस.के.24 तास


गडचिरोली : सायकल चालवणे म्हणजे आपले आरोग्य उत्तम करणे होय.  प्रदूषण मुक्त आणि पर्यावरणयुक्त वातावरण मनाला प्रसन्न करणारे असते. त्यामुळे सायकल चालवा अभियान जिल्ह्यातील विविध भागात नियमित सुरू ठेवावे , असे आवाहन सायकल स्नेही मंडळाचे प्रेरक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी केले. तसेच या कार्यासाठी ज्येष्ठ समाजसेवी डॉ. शिवनाथ कुंभारे आणि पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे,प्रंचित सावकार पोरेड्डीवार यांचे वेळोवेळी सहयोग मिळाल्याचे त्यांनी सांगितले.


सायकल चालवा,आरोग्यवान व्हा आणि पर्यावरण वाचवा असा संदेश देत पर्यावरण जनजागृती अभियान नियमितपणे सायकल स्नेही मंडळाच्या वतीने गडचिरोली शहर  परिसरात  करण्यात येत आहे.या मंडळाच्या वतीने आयोजित निरोप कार्यक्रमात बंडोपंत बोढेकर बोलत होते. 


अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सायकल स्नेही विलासराव निंबोरकर होते.महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.योगेश पाटील,ज्येष्ठ पत्रकार उदयराव धकाते,प्रसिद्ध कवी उपेंद्र रोहणकर,गीतकार पुरूषोत्तम ठाकरे,सौ.पारखी  यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

प्रास्ताविक मंडळाचे कार्याध्यक्ष प्रा.विलासराव पारखी यांनी करताना मंडळाच्या विविध उपक्रमावर प्रकाश टाकला. उदय धकाते यांनी बोढेकर गुरुजी यांनी सुरू केलेल्या ग्रामगीता घरोघरी, व्यवसाय प्रशिक्षण,व्यसनमुक्ती यासारख्या विविध प्रेरक उपक्रमांची माहिती दिली. विलासराव निंबोरकर यांनी बोढेकरदादांच्या सातत्यपूर्ण संपर्कामुळे सायकल चालवा  जनजागृती अभियानाला गती आल्याचे सांगितले. 


ज्येष्ठ नागरिकां सोबतच  विद्यार्थ्यांमध्ये सायकल चालविण्याची गोडी अलिकडे वाढत असल्याचे याप्रसंगी डॉ. योगेश पाटील म्हणाले. कवी उपेंद्र रोहणकर आणि पुरूषोत्तम ठाकरे यांनीही समयोचित विचार व्यक्त करून स्वरचित सायकल कवितांचे उत्तम सादरीकरण केले.शेवटी मंडळाचे वतीने बंडोपंत बोढेकर यांचा मानवस्त्र व गौरव चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. दामोधर उप्परवार यांनी आभार प्रदर्शन यांनी केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !