अतिक्रमण जागेवरील अनधिकृत गोडाऊनला धान्य खरेदीची परवानगी. ★ गोडाऊन दाखवा,धान्यकेंद्र मिळावा.

अतिक्रमण जागेवरील अनधिकृत गोडाऊनला धान्य खरेदीची परवानगी.


★  गोडाऊन दाखवा,धान्यकेंद्र मिळावा.


★ धान्य खरेदी केंद्राच्या परवानगी संबंधाने डी.एम.ओ.भंडारा यांचा अफलातून प्रकार.


नरेंद्र मेश्राम - भंडारा जिल्हा प्रतिनिधी


भंडारा  : एकीकडे धान्य खरेदी केंद्राच्या परवानगी करिता तारेवरची कसरती करावी लागत असताना. नियम धाब्यावर बसविण्याची भाषा खुद डी.एम.ओ. भंडारा यांनी चिंचोलीचे सरपंच प्रमोद प्रधान यांच्या सोबत मोबाईल वर केली आहे.वादग्रस्त गोडाऊनमध्ये धान्य खरेदी केंद्राला मंजुरी हा विषय सध्या चर्चेत आहे.


 लाखांदूर  तालुक्यातील चिंचोली/अंतरगाव येथील अतिक्रमण जागेवर बांधलेल्या अनधिकृत गोडाऊन मध्ये तथागत सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेला धान्य खरेदी करिता डी.एम.ओ. भंडारा कडून परवानगी देण्यात आल्याचे दि. 16 डिसेंबरला पार पडलेल्या सुभारभाप्रसंगी दिसून आले. दि. 2 डिसेंबर ला डी.एम.ओ. भंडारा यांचेकडे वादग्रस्त गोडाऊनमध्ये धान्य खरेदीची परवानगी देऊ नये यासंबंधाने ग्रामपंचायत चिंचोली/अंतरगाव ने तक्रार करूनही दखल न घेता जी संस्था मंजूर झाली त्या संस्थेला गावातील वादग्रस्त शासकीय जागेवर परवानगी न घेतलेल्या गोडाऊन मध्ये धान्य खरेदी करण्याची परवानगी कशी दिली.  मा. जिल्हाधिकारी भंडारा व तहसीलदार तहसील कार्यालय यांचे कडे गोडाऊन पाडण्याची कायदेशीर परवानगीचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. 


 त्या गोडाऊन च्या कागदपत्रांची कोणतीही सहानिशा न करता त्यांना परवानगी दिलिच कशी! हा प्रश्न आहे. परवानगी मिळालेल्या गोडाऊनच्या संदर्भात घर ट्क्स पावती, नमुना 8, ग्रामपंचायतचा नाहरकत प्रमाणपत्र, सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी , ग्रामपंचायतची परवानगी, इन्शुर्न्स व आवश्यक इतर कागदपत्र सादर न करता किंवा कागद पत्रांची पडताडणी न करता परवानगी कशी दिली हा प्रश्न उपस्थित झाला आहे. धान्य साठवणुकीदरम्यान एखादा अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोण? यासंबंधाने चिंचोली चे सरपंच प्रमोद प्रधान यांनी विचारणा करण्याकरिता डी. एम. ओ. भंडारा यांना फोन केला होता.


 तेव्हा "फक्त बोट दाखून गोडाऊन माझा आहे म्हणा...कसल्याच परवानगीची गरज  नाही, असे बिनबुडाचे उत्तर देत डी.एम.ओ.भंडारा यांनी सरसकट पोलिसात तक्रार दाखल करण्याची धमकि सरपंच प्रमोद प्रधान यांना दिल्याचे सांगण्यात येते. हा विषय एवढ्यावरच थांबणार नसून मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मा. उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मा. डॉ. परिणय दादा फुके वी.प. सदस्य, व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य को-ऑप मार्केटिंग फेडरेशन मुंबई तथा अन्न व पुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य यांचेकडे तक्रार करणार असल्याचे सरपंच प्रमोद प्रधान यांनी सांगितले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !