मॅजिक बस तर्फे पवनी तालुक्यातील विविध गावात स्टडी कॉर्नर किट चे वाटप.



मॅजिक बस तर्फे पवनी तालुक्यातील विविध गावात स्टडी कॉर्नर किट चे वाटप.


एस.के.24 तास


पवनी : मॅजिक बस इंडीया फाउंडेशन स्केल प्रकल्प,तालुका पवनी तर्फे मॅजिक बस कार्यक्षेत्रात येणाऱ्या विविध शाळांमध्ये  "हर घर स्टडी कॉर्नर अभियान " 5 डिसेंबर ते 24 डिसेंबर या कालावधीत राबविण्यात आला. हा कार्यक्रम मॅजिक बस चे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक निक्की सर व तालुका प्रकल्प व्यवस्थापक विनोद शंभरकर यांच्या मार्गदर्शनातून घेण्यात आला.

" हर घर स्टडी कॉर्नर " हा उपक्रम तालुक्यातील 50 गावातील 73 शाळांमध्ये राबविण्यात आला असून या उपक्रमाच्या माध्यमातून वर्ग 6 ते 9 च्या 8000 विद्यार्थ्यांना स्टडी कॉर्नर किट चे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमात शाळा व विद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद,व 50 गावातील मॅजिक बस समुदाय समन्वयक व मॅजिक बस शाळा साहाय्यक अधिकारी वसंत पोटे,भूषण कोकुडे,मोनाली धुर्वे,प्रेरणा वानखेडे,लक्ष्मी बनकर व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !