गडचिरोलीत मेंढपाळांचा आक्रोश मोर्चा.
जिल्हाधिकारी,संजय मिना यांना निवेदन देताना शिष्टमंडळ... |
★ मेंढ्यांसह हजारोंच्या संख्येत धनगर समाज धडकला जिल्हाधिकारी कार्यालयावर.
सुरेश कन्नमवार!मुख्य संपादक!एस.के.24 तास
गडचिरोली : "बोगस झाडे हटाव, धनगर आरक्षण बचाव","वनक्षेत्रात चराईस परवानगी द्यावी", "येळकोट येळकोट,जय मल्हार" च्या घोषणा देत झाडे हे बोगस धनगर असल्याने हटविण्याची कारवाई करावी,वनक्षेत्रात शेळ्या मेंढ्या चराईस परवानगी द्यावी या मागण्यांसाठी धनगर समाजाचा मोर्चा गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयावर मेंढ्यांसह हजारोंच्या संख्येत धडकला.
मोर्चा धनगर समाजाच्या हजारो लोकांनिशी शेळ्या मेंढ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर पोचल्यानंतर सभेला सुरवात झाली.मोर्चेकऱ्यांना मोबाईलवरून बहुजन विकास,मागास मंत्री अतुल सावे,वनमंत्री सुधीर मुनगंटीवार,माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी संबोधित करून प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. यावेळी माजी राज्यसभा खासदार डॉ,विकास महात्मे,धनगर समाज संघर्ष समिती नागपूर विभाग अध्यक्ष डॉ,तुषार मर्लावार,माजी सभापती,विजय कोरेवार,डॉ.नारायण मर्लावार,संजय कन्नावार, डॉ.यशवंत कन्नमवार,मुखरूजी ओगेवार,विस्तारीजी फेबुलवार,हरीश खुजे,हेमांतकुमार ढोले,संदीप शेरकी,साईनाथ बुचे,कृष्णां गंजेवार,रौनक फेबुलवार यांनी मोर्चेकऱ्यांना संबोधित केले.