लाखनी तालुक्यात हत्तीच्या कळपाचा हैदोस.
★ अनेक गावातील शेतकऱ्यांचे धान व ऊस पिकाचे नुकसान.
◆ एस.के.24 तास
भंडारा : तालुक्यात मागील ३ दिवसापासून २३ जंगली हत्तीचा कळप डेरे दाखल असून या हत्तीच्या कळपाने रेंगेपार/कोहळी, चिचटोला, शिवणी, धानला इत्यादी गावातील धानाचे पुजणे, पोत्यात भरलेले धान आणि उसाच्या शेतीची नुकसान केल्याची घटना शुक्रवार(ता.२) सकाळी उघडकीस आली. या प्रकाराने हजारो रुपयाचे नुकसान झाले असल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.
वन परिक्षेत्र लाखनी व साकोली चे सीमेवर असणाऱ्या वनरक्षक बीट बरडकिन्ही येथे मागील २ दिवसापासून हत्ती तळ ठोकून होते. त्यांनी रेंगेपार येथील ९ शेतकऱ्यांचे धानाचे नुकसान तर मातोश्री गो शाळेतील टिनांची पडझड करून नुकसान केली होती. गुरुवारी रात्रीच्या सुमारास हत्तीच्या कळपाने सहवन क्षेत्र लाखनी चे अधिनस्त असलेल्या वनरक्षक बीट रामपुरी कडे मार्गक्रमण करीत असताना फुलचंद बोरकर यांचे चिचटोला शेतशिवारात ऊस बीज निर्मिती करणाऱ्या शेताचे प्रचंड प्रमाणात नुकसान केले. तर शिवणी येथील संजय शेंडे यांच्या मोटार पंप व पाईप चे व रेवाराम काळे आणि नरेश गायधने यांच्या पुजन्याचे नुकसान केले आहे. तसेच धानला(चान्ना) येथील नरेश सदाशिव झलके, देवानंद दमोदर झलके,गोपाल दमोदर झलके यांचे मळणी केलेल्या धानाचे खळ्यावर ठेवलेले धानाच्या पोत्यांचे नुकसान केले आहे.
तर चान्ना येथील अंबादास बनकर यांच्या पूजन्याचे श्रचे प्रचंड प्रमाणत नुकसान केले आहे. या प्रकाराने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महसूल व वन विभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. तसेच वन विभागाने या जंगली हत्तीच्या कळपाचा बंदोबस्त करावा. अशी मागणी होत आहे.
मागील ४ ते ५ दिवसापासून तालुक्यात जंगली हत्तीच्या कळपाचा मुक्काम असून त्यांनी अनेक शेतकऱ्यांचे पुजने व मळणी केलेल्या धानाच्या पोत्याचे प्रचंड प्रमाणत नुकसान केली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी.
- प्रणाली विजय सार्वे,सभापती प.स.लाखनी