म.रा.पोलीसपाटील श्रमिक संघटनेच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी मारोती राऊत यांची निवड.



म.रा.पोलीसपाटील श्रमिक संघटनेच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी मारोती राऊत यांची निवड.


एस.के.24 तास


 चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील श्रमिक संघटनेची राज्य कार्यकारणीची सभा यवतमाळ येथे नुकतीच संपन्न झाली.  राज्याचे अध्यक्ष गंगाधरजी उगे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच हरिदास घोरपडे   राज्य सचिव यांच्या उपस्थितीत  झालेल्या विशेष सभेत चंद्रपूर जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून कवठाळा येथील मारोती प्रभुजी राऊत या पोलीस पाटलाची म्हणून सर्वांनुमते  निवड करण्यात आली आहे.  सदर नियुक्तीचा कार्यकाळ तीन वर्षाचा असून या संघटनेच्या माध्यमातून पोलीस पाटलाच्या न्याय हक्काच्या मागण्यांकरिता प्रयत्न केले जाणार आहे.  


मारोती राऊत हे  गेल्या सहा वर्षापासून कवठाळाचे पोलीस पाटील असून त्यांनी गावाच्या विकासाकरता  योगदान दिलेले आहे.म.गांधी तंटामुक्त अभियान, गुरुदेव सेवा मंडळाच्या  कार्यात ते  सदैव  पुढाकार घेत असतात.  कोरोना काळातही त्यांनी केलेल्या विशेष कामगिरीचे कौतुक शासन स्तरावर झालेले आहे.ते राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे कार्यकारणी सदस्य असून ते अनेक सेवा कार्यात  आघाडीवर असतात. शासन  मान्यता प्राप्त सार्वजनिक ग्रंथालय संघाचे ते जिल्हा सचिव आहे .


त्यांच्या या निवडीबद्दल पोलीस पाटील साईनाथ  मांदाडे एकोडी,प्रमोद देरकर बोरगाव,देवानंद ठाकरे गाडेगाव,संजय मडावी शिरूर,पुरुषोत्तम गावंडे भोयेगाव,सुनील आत्राम जैतापूर,बिभीषण कुमरे पालगाव,तुकाराम जाधव लिंगनडोह, उषा गेडाम बेलगाव, योगिता टिपले हिरापूर तसेच जिल्ह्यातील इतर पोलीस पाटलांनीही मारोती राऊत यांचे अभिनंदन केले आहे. आपल्या न्याय मागण्या मंजूर करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटलांनी संपर्क करावा तसेच तालुकास्तरावर समित्या गठीत कराव्यात,असे आवाहन नवनिर्वाचित अध्यक्ष मारोती राऊत यांनी केले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !