जातीचे खोटे प्रमाणपत्र देणारे व घेणारे यांचेवर जिल्हाधिकारी फौजदारी गुन्हे दाखल करणार का. ?



जातीचे खोटे प्रमाणपत्र देणारे व घेणारे यांचेवर जिल्हाधिकारी फौजदारी गुन्हे दाखल करणार का. ?  


सुरेश कन्नमवार!मुख्य संपादक!एस.के.24 तास


गडचिरोली : गडचिरोली – गडचिरोली उपविभागीय अधिकारी यांचेकडून जातीचे प्रमाणपत्र चुकीच्या पध्दतीने दिले जात असुन चक्क एकाच व्यक्तीला दोन वेगवेगळे जातीचे प्रमाणपत्र दिल्या गेले तर मुलांनाही वेगवेगळे दाखले दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे शासनाची फसवणुक करणाऱ्या अधिकारी व संबंधित व्यक्तिवर कारवाई होणार का ? असे प्रश्न चर्चिल्या जात आहेत. 


सविस्तर वृत्त असे की, गडचिरोली जिल्हयात झाडे कुणबी या जातीची संख्या फार मोठया प्रमाणात असुन इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) या प्रवर्गात मोडतात. मात्र ओबीसी प्रवर्गात फार सवलती नसल्याने भटक्या जमाती क प्रवर्गात धनगर जातीतील तत्सम जमात झाडे ही जात असल्याने याचा गैरफायदा घेत खोटे पुरावे सादर करीत झाडे जातीची जात प्रमाणपत्र गडचिरोली जिल्हयातील उपविभागीय अधिकारी यांचेकडून घेत असल्याचा प्रकार माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीवरून उघड झाले आहे.


 गुरवळा येथील रमेश मंगरू तुंकलवार यांनी तहसिलदार गडचिरोली यांचेकडून 30 जानेवारी 1984 ला काढलेले जात प्रमाणपत्र ओबीसीचे कुणबी असुन 15 मार्च 2010 चे प्रमाणपत्र भटक्या जमाती क चे झाडे आहे.तर त्याचीच मुलगी उषाताई रमेश तुंकलवार हिचे जात प्रमाणपत्र 29 जुलै 2005 ला कुणबी चे तर 26 नोव्हेबर 2010 चे प्रमाणपत्र झाडे आहे. नवेगाव (गडचिरोली) येथील अजय ऋषी तुंकलवार यांचे जात प्रमाणपत्र कुणबी, त्याचीच मुलगी समीक्षा अजय तुंकलवार हिचे प्रमाणपत्र झाडे तर त्याचेच भाउ विजय व श्याम ऋषी तुंकलवार यांचे प्रमाणपत्र झाडे ची आहेत.त्यांचेच नवेगाव (गडचिरोली) येथील नातेवाईक अंकित गजानन तुंकलवार व अमित देवीदास तुंकलवार दोन्ही मागील पोलीस भरतीमध्ये कुणबी (ओबीसी) व निशांत परशुराम गोटेवार, श्रीकृष्ण दशरथ दुबलवार, समुद्री किसनदास पुरकलवार यांची झाडे (एनटीसी) या राखीव प्रर्वगातुन नियुक्ती झालेली आहे. याचाच अर्थ झाडे कुणबी हे झाडेचे प्रमाणपत्र काढतांना कोतवाल पंजी, अधिकार अभिलेख पंजी, पी 1 अश्या जुन्या कागदपत्रांवर झाडे कुणबी असा लिहिलेला असतांना कुणबी यास खोडतोड करून झाडे ठेवुन शासनाची दिशाभुल करीत आहेत.


 झाडे कुणबी यांनी कुणबी खोडतोड करून झाडेचे खोटे पुरावे सादर करून गैरमार्गाने (चिरीमिरी देवुन) जिल्हा जात पडताळणी समिती चंद्रपुर यांचेकडून जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त केले परंतु गडचिरोली जिल्हा जात पडताळणी समितीने त्यांचेच नातेवाईकांचे जात वैधता प्रमाणपत्राचे अर्ज झाडे कुणबीचे पुराव्यानुसार फेटाळत आहे. यावरून किती मोठा भ्रष्टाचार झाल्याचे दिसुन येत आहे.धनगर व धनगरांचे तत्सम जातीचा व्यवसाय मेंढपाळ असुन ते एकाठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वारंवार पुर्वी व आजही भटकंती करीत असल्याने ती भटकी जमात आहे तर झाडे कुणबी हा पुर्वीपासुनच शेती करित असुन स्थायी आहे. झाडे कुणबी यांनी बोगस प्रमाणपत्राचे आधारे शासकिय नोकरीही मिळवुन शासनाची फसवणुक करित आहेत.असाच प्रकार गडचिरोली जिल्यातील चामोर्शी,मुलचेरा व इतरही तालुक्यात तसेच चंद्रपुर जिल्यातील सावली व मुल तालुक्यात झालेला आहे.


 चामोर्शी व मुलचेरा तालुक्यात माहितीचा अधिकारान्वये माहिती मागविलेली असतांना आजपावेतो माहिती देण्यास टाळाटाळ केल्या जात आहे.  दिशाभुल करून बोगस प्रमाणपत्र मिळविणाऱ्या व्यक्तींवर व शहानिशा न करता प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यावर फौजदारी कारवाई करण्याची तरतुद असल्याने जिल्हाधिकारी कारवाई करतील का.? असा प्रश्न धनगर समाजांनी उपस्थित होत आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !