बुध्दिस्ट अल्पसंख्यांक शिक्षण संस्था असोशियशन भंडारा तर्फे शिक्षणमंञ्याना निवेदन सादर.
एस.के.24 तास
भंडारा : नागपुर विधान भवनातील शिक्षण मंत्र्याच्या दालनात शालेय शक्षण मंत्री ना.दिपक केसरकर यांची बुध्दिस्ट अल्पसंख्यांक शिक्षण संस्था असाेशिएशन भंडाराच्या शिष्टमंडळानी दि.26/12/22 ला भेट घेऊन शिक्षक पदभरती बंदी,पदमान्यता व इतर समस्येबाबद सविस्तर चर्चा केली.शिक्षण मंत्र्यानी त्यांचे सहसचिव मा.महाजन यांना प्रत्येक जिल्ह्यातील अल्पसंख्यांक संस्थेतील शिक्षकांच्या रिक्त पदाची माहीती मागवून त्यांची रिक्त पदे भरण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्यात.याशिवाय शिक्षकाच्या वैयक्तीक बदमान्यता ,उच्च न्यायालयांचे निकालानुसार सुध्दा पदमान्यता नाकारने ई.विषयावर सकारात्मक चर्चा झाली.शिष्टमंडळात अम्रुत बन्साेड,रामकुमार गजभिये,प्रभुदास गजभिये,भीमराव टेंभुर्ण,धनंजय तिरपुडे यांचा समावेश हाेता.