राज्यस्तरीय शिक्षक सेवागौरव पुरस्काराने सुनिल हटवार सन्मानित.

राज्यस्तरीय शिक्षक सेवागौरव पुरस्काराने सुनिल हटवार सन्मानित.


अमरदिप लोखंडे ! मार्गदर्शक तथा सहसंपादक ! एस.के.24 तास


ब्रह्मपुरी : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जालना येथील " १०० शिक्षक क्लब आॕफ जालना " च्या वतीने दिनांक ४ डिसेंबर २०२२ ला जे.ई.एस . महाविद्यालय जालना येथे पुरस्कार सोहळा पार पडला.


यात महाराष्ट्रातील २८ कर्तबगार शिक्षक व शिक्षिकांना " शिक्षक सेवा गौरव " पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा उचित सन्मान करण्यात आला . यामध्ये नागभीड पंचायत समिती अंतर्गत जि.प.उच्च प्राथ.शाळा पारडी (ठवरे) येथील तंत्रस्नेही व उपक्रमशील शिक्षक श्री.सुनिल रूषीजी हटवार यांचा शाल,फेटा,प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.  


कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून जेष्ठ समाजसेवक तथा प्रसिध्द उद्योगपती मा . सुनिलजी रायगट्टा तर प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून मा.अंजली धानोरकर , उपजिल्हाधिकारी, औरंगाबाद ह्या उपस्थित होत्या . कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मंगला धुपे , शिक्षणाधिकारी जालना, डायट जालना चे प्राचार्य मा. विजयकुमार शिंदे,डॉ.सतिश सातव शिक्षण उपनिरीक्षक , प्राचार्य डॉ.शिवनारायण बजाज,डॉ.दत्तात्रय गाडे व उदय शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते . या पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्यातील २८ शिक्षकांचा व ५ आदर्श शाळांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. 


यात १४ शिक्षक जिल्हा परिषदेचे व १४ शिक्षक खाजगी शिक्षण संस्थेतून निवडण्यात आले होते.हा शिक्षक सेवा गौरव सोहळा म्हणजे शिक्षकांनीच आपल्या कर्तबगार शिक्षकांचा केलेला सत्कार होय असे प्रतिपादन प्रमुख अतिथींनी केला.श्री. सुनिल हटवार यांचा " शिक्षक सेवा गौरव " पुरस्काराने सन्मान झाल्यामुळे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !