आम आदमी पार्टी शाखा नागभीड च्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

आम आदमी पार्टी शाखा नागभीड च्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.


एस.के.24 तास


नागभीड : राज्यातील जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर महाराष्ट्र सरकारने तातडीने निर्णय घ्यावा,अशी मागणी आहे.नागभीड दिनांक ०५/१२/२०२२ तहसील कार्यालयात आप पक्षाचे नागभीड तालुका संयोजक,योगेश सोनकुसरे , संगठण मंत्री,सुरेशजी कोल्हे,तालुका सचिव प्रमोद भोयर , नागभीड शहर संयोजक नानक नाकाडे,नागभीड शहर उप संयोजक दिगांबर कनकावार,यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य शासनाने लोकांच्या गरजेनुसार काम करून समस्या सोडविण्याचे निवेदन सादर केले.


गेल्या ४ महिन्यांत सत्तेवर आलेल्या शिंदे फडणवीस सरकारच्या असंवेदनशील कारभारामुळे शिक्षण,घर,वीज,सरकारी नोकऱ्या,शेतकरी-शेतमजूर,शेती आदी दैनंदिन समस्या सोडवणे कठीण झाले आहे.या संदर्भात महाराष्ट्र राज्यातील आम आदमी पार्टीचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमार्फत तहसीलदारांना  निवेदन देण्यात आले.


मागण्या : -

१) संपूर्ण राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई प्रती हेक्टरी ५० हजार देण्यात यावी.पिक विमा कंपनीला सरसकट पिक विमा देणे अनिवार्य करावे.


२) शेतमजुरांना रोजगार हमी योजनेअंतर्गत काम देण्यात यावे.


३)  शेतीला दिवसा १२ तास वीज पुरवठा करावा, थकीत वीज बिल व शेती कर्ज माफ करावे.


४) सर्व विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी तातडीने निर्णय घावेत,अंश कालीन कर्मचाऱ्यांना तातडीने कायम करण्यात यावे.


५)  सरकारी शाळा दिल्लीच्या धर्तीवर दर्जेदार कराव्यात, कमी पट संख्या असलेली एकही शाळा बंद होणार नाही याची हमी द्यावी.


६)  खाजगी शाळा प्रशासनाकडून पालकांची होणारी आर्थिक लुट थांबविण्यासाठी शुल्कावर नियंत्रण आणावे व शिक्षण अधिकार कायद्याची काटेकोर पणे अंमलबजावणी करण्यात यावी. 


७) पंतप्रधान आवास योजनेतील रखडलेला निधी तात्काळ उपलब्ध करून द्यावा.


८) अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला आदिवासी व बिगर आदिवासिंना वन जमिनीचे पट्टे देण्याचा प्रश्न निकाली काढून वाहितदारांना पट्टे देण्यात यावे.


९) वन्य प्राण्याचा बंदोबस्त करण्यासाठी अस्तित्वाव असलेल्या कायद्यात बदल करावा.


गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र सरकारकडून या मागण्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करीत आहोत,मात्र अद्यापही या मागण्यांवर विचार झाला नाही परंतु आपण या मागण्यांना पूर्ण कराल हा आम्हाला विश्वास आहे.आमची आपणास विनंती आहे की आपण अधिवेशनाआधी याबाबत तोडगा काढून महाराष्ट्र राज्य तील जनतेला न्याय द्यावा ही नम्र विनंती.


जर वरील मागण्या अधिवेशनापूर्वी मान्य झाल्या नाहीत तर येत्या हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे आम आदमी पार्टी या मागण्यांना घेऊन राज्यव्यापी जन मोर्चा काढणार आहोत.

 



#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !