वडसा देसाईगंज च्या सट्टा किंगला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. ★ सट्टा व्यवसायीकांचे धाबे दनाणले.

 


वडसा देसाईगंज च्या सट्टा किंगला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.



★ सट्टा व्यवसायीकांचे धाबे दनाणले.


● एस.के.24 तास


वडसा /  देसाईगंज : पोलिसांनी आठवडाभरात भरिव कामगिरी करत सट्टा व्यवसायीकांवर लगाम कसली असुन आज दि ३ ला शिवमंदिर परिसरा जवळील खुल्या आवारात सट्टा किंग रामु तिवारी यास अटक केली .


सविस्तर वृत्त असे की देसाईगंज तालुक्यातिल प्रत्येक गावात या सट्टा व्यवसायीकांनी आपले प्रतिनिधी नेमले असुन या प्रतिनिधींच्या माध्यमातुन दररोज लाखो रुपयांचा सट्टा व्यवसाय केला जातो या व्यवसायात अनेक करोडपतींचा समावेश असुन शहरातिल अनेक अवैद्य धंद्यात गुंतलेल्या कुख्यात लोकांसह त्यांच्या मुलांनीही आपला जम सट्टा व्यवसायात बसविल्याचे दिसुन येताच देसाईगंज पोलिसांनी या सट्टा व्यवसायीकांवर लगाम कसण्याचा बेत आठवडा भरापासुन आखला असुन आज प्राप्त माहिती नुसार



 देसाईगंज चे पोलिस निरिक्षक महेश मेश्राम यांचे मार्गदर्शनात उपनिरिक्षक द्न्यानेश्वर लांडे यांनी धाडसञ मोहिम सुरु करुन देसाईगंज च्या अनेक सट्टा व्यवसायीकांसह सट्टाकींग रामु तिवारी वय ३२ वर्षे राह हनुमान वार्ड देसाईगंज याला मोबाईल वर सट्टा पट्टी लिहितांना रंगेहाथ पकडले या कार्यवाहित अटक केलेल्या आरोपी रामु तिवारी याने सट्टाचा कारोबार आरमोरीच्या रोशन भैसारे नामक व्यक्तिसोबत मिळुन करत असल्याची कबुली दिली महाष्ट्र जुगार अधिनियम कलम१२ अ व सहकलम १०९ भादवी नुसार गुन्ह्याची नोंद करुन रामु तिवारी याला अटक करुन पुढिल तपास उप निरिक्षक लांडे करीत असुन या कार्यवाहित उप निरिक्षक सोनम नाईक उपनिरिक्षक ईनामदार भोपळे पोशी जुवारे सोनवाने मिरगे यांनी सहकार्य केले.


#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !