ब्रेकिंग न्युज...
राजगाटा माल (जेप्रा) येथील महिला वाघाच्या हल्ल्यात ठार.
सुरेश कन्नमवार!मुख्य संपादक!एस.के.24 तास
गडचिरोली : आज दिनांक,23/12/2022 वेळ,12:25 वा. तालुक्यातील पोर्ला वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या कक्ष क्रं,565 राजगाटा माल (जेप्रा) येथे वास्तव्य करणारी सौ.ताराबाई बाबुराव लोनबले वय,60 वर्ष ही महिला गावापासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या शेत शिवारात ती शेतात शेतकाम करीत असताना अचानक नरभक्षी वाघाने महिलेच्या पाठीवर हल्ला करून महिलेला ठार केले.
मृतक महिला शेतात काम करत असताना नरभक्ष वाघाने महिलेवर हल्ला करून 100 मिटर पर्यत फरकडत जंगलात नेला.अमिरझा मार्गाने गडचिरोली कडे येत असताना एस.के.24 तास चे मुख्य संपादक,सुरेश कन्नमवार व राहुल रामटेके यांना वाघाच्या हल्याची बातमी कडताच माहिती घेतली.
गावाकऱ्यांनी महिलेच्या मदतीला धावून आले पण महिले जागीच ठार झाली होती.महिलेलला बघण्यासाठी गावाकऱ्यानी सोबत वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुद्धा उपस्थित होते.
मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी गडचिरोली येथे नेण्यात येणार आहेत.