वाघाच्या हल्ल्यात जखमी महिला देत आहे मृत्यूशी झुंज...

वाघाच्या हल्ल्यात जखमी महिला देत आहे मृत्यूशी झुंज...


एस.के.24 तास


गडचिरोली : तालुक्यातील व चातगाव वनपरिक्षेत्रां अंतर्गत येत असलेल्या आंबेशिवणी,आंबेटोली येथे वास्तव्य करणारी सोनम जितेंद्र उंदीरवाडे वय 24वर्ष ही महिला घर परिसरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या शेत शिवारात आपल्याला दोन वर्षाच्या लहान मुलीला घेऊन ती शेतात शेतकाम करीत असताना अचानक नरभक्षी वाघाने महिलेच्या पाठीवर हल्ला करून महिलेला गंभीर रित्या जखमी केले.


जखमी महिले शेजारी असलेल्या एका वीस वर्षाच्या तरुण मुलांनी नरभक्ष वाघाचा महिलेवर हल्ला होताच त्यांनी मोठ मोठ्यांनी ओरडून नरभकक्ष वाघाला पडून लावले.लगेच त्या मुलांनी आपल्या मोबाईलवर गाववकऱ्यांशी संपर्क साधून नरभक्षक वाघच्या तावडीतून महिलेला वाचविले.



वाघच्या हल्याची बातमी कडताच गावाकऱ्यांनी महिलेच्या मदतीला धावून व लगेच जखमी महिलेला गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले.जखमी महिलेची प्रकृती गम्भीर स्वरूपाची असून जखमी महिला मृत्यूशी झुंज देत आहे.जखमी महिलेल बघण्यासाठी गावाकऱ्यान सोबत वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुद्धाजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन मदतीचा हात दिला. गडचिरोली जिल्हा शल्यचिकिस्क डॉक्टर,अनिल रुडे यांनी सुद्धा जखमी महिलेची पाहणी करून महिलेवर योग्य उपचार करण्याचे सांगितले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !