अमरदीप लोखंडे यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज रत्न पुरस्कार देऊन सन्मान.
एस.के.24 तास
ब्रम्हपुरी : २७/१२/२२ ब्रह्मपुरी तालुक्यातील अ-हेर नवरगाव येथील रहिवासी श्री अमरदीप प्रल्हाद लोखंडे यांनी केलेल्या सामाजिक ,शैक्षणिक, वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि सदैव मदतीचा हात देण्यासाठी पुढाकार घेऊन सहकार्य करण्याच्या कामाची नागपूर येथील ' मदत ' या सामाजिक संस्थेने दखल घेऊन त्यांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज रत्न पुरस्कार प्राध्यापक जोगेंद्रजी कवाडे यांच्या शुभहस्ते देऊन त्यांचा सन्मान केला.
सदर सन्मान सोहळा नागपूर येथील गुरुदेव सेवाश्रम येथे पार पडला.या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून गिरीश भाऊ पांडव,तर प्रमुख अतिथी म्हणून मदत सामाजिक संस्थेचे सचिव दिनेश बाबू वाघमारे ,अभिजीत वंजारी,तक्षशिला वाघमारे,रमेश लोखंडे, इंजिनियर प्राध्यापक प्रकाश सोनक,रूपराज गौरी ,सुभाष भोयर माजी नगरसेवक,प्राध्यापक जे .टी लोणारे,एडवोकेट अशोक येवले उपस्थित होते.
सदर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर समाज रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री अमरदीप लोखंडे यांचे सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केल्या जात आहे.