बल्लारपूर पेपर मिल च्या विरोधात प्रिया झांबरे यांचे आमरण उपोषण.
एस.के.24 तास
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यामधील बल्लारपूर शहर हे बल्लारपूर येथे असलेल्या पेपर मिल मुळे नावलौकिकास आले शहराला मोठ्या प्रमाणावर शोभा आली रोजगार उत्पन्न झाले परंतु काही मिळवण्यासाठी निश्चितच काही गमवावे लागते अशाच पद्धतीने पेपर मिल मुळे प्रदूषणामध्ये वाढ होणे हवेमध्ये दूषित गॅस पेपर मिल च्या माध्यमातून पसरविला जाणे याचे प्रमाण हळूहळू वाढायला लागले प्रदूषण विभाग देखील अनेक वेळा तक्रारी होऊ नये याकडे दुर्लक्षच करीत असतानाचे आपण बघितले आहे.
पेपर मिल ही गेल्या अनेक वर्षांपासून एका प्रस्थापित युनियनची गुलाम झाली असल्याचा आरोप करीत अनेक संघटनांनी आंदोलन केले परंतु त्यांची आंदोलन दडपण्यात आली तेव्हा ना आंदोलक नेते हे सेटल झाले असा देखील आरोप बरेच वेळा कामगारांनी लावला त्यामुळे आता कामगारांना नेत्यांवरचा विश्वासच राहिलेला नाही परंतु कामगारांची समस्या कामगारांचे होत असलेले शोषण हे आजही बल्लारपूर पेपर मील मध्ये कायम आहे.जिल्ह्यातील एका बलाढ्य मानल्या जाणाऱ्या नेत्याची किमान दोन दशकांपासून त्या ठिकाणी युनियन आहे. कुठल्याही बेरोजगाराला स्थायी अथवा अस्थायी करण्याची ताकद ही कंपनी प्रशासनामध्ये नसून युनियन मध्ये आहे. जे निश्चितच बेकायदेशीरपणे सुरू आहे.कामगार कायद्याला तिलांजली देत सर्रासपणे मनमानी कारभार या बलाढ्य नेत्याची युनियन करते आहे. व यांना थांबविण्याकरिता झालेल्या सर्व प्रयत्नांना साम,दाम,दंड भेद वापरून या बलाढ्य नेत्याने आज पर्यंत विजय मिळवला आहे.
परंतु कामगारांच्या मनात मात्र हा नेता आजही घर बनवू शकलेला नाही. आजही या मोठ्या नेत्याला कामगाराच्या मनामध्ये स्थान नाही.फक्त भीती पोटी म्हणून कामगार हा आपला आवाज मनामध्येच ठेवून युनियनला शरण गेलेला आहे. ही सर्व परिस्थिती बदलविण्याकरता व कामगारांचा संपलेला आत्मविश्वास कामगार कायद्यावर व कायद्यावर उडालेला विश्वास परत प्रस्थापित करण्याकरता व कामगारांना न्याय मिळवून देण्याकरता युवा स्वाभिमान पक्षाच्या बल्लारपूर महिला आघाडी अध्यक्ष श्रीमती प्रिया झांबरे या स्वतः कामगारांचे शोषण थांबवावे, कामगारांना किमान वेतनाप्रमाणे वेतन मिळावे तसेच नियमानुसार अस्थायी कामगारांना स्थायी करण्यात यावे व अस्थायी कामगाराला स्थायी करण्याकरता युनियनच्या माध्यमातून होत असलेला भ्रष्टाचार थांबावा तसेच बल्लारपूर पेपर मिल मुळे पेपर मील मागील रहिवासी परिसरात पहाटे पहाटे तीन ते चार वाजता सोडण्यात येणाऱ्या गढूळ पाण्याने तेथील परिसरातील नागरिकांना होणारा त्रास हा कायमस्वरूपी बंद करण्यात यावा याकरिता नगर परिषद बल्लारपूर जवळ पोलीस स्टेशन समोर "आमरण उपोषणाला " सुरुवात केली आहे.
पेपर मिल तथा बल्लारपूर नगरीतील नागरिकांनी या उपोषणाला सार्थक करण्याकरता व बल्लारपूर पेपर मिल मधील कामगारांच्या समस्यांना कायमस्वरूपी तोडगा काढण्याकरता साथ द्यावी अशी विनंती युवा स्वाभिमान पक्षातर्फे करण्यात आली आहे.वृत्त लिहिस्तोवर तरी पेपर मिल् कंपनी प्रशासनाने तसेच स्थानिक प्रशासनाने आंदोलनाची कुठलीही दखल घेतली नसल्याचे युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे यांनी सांगितले आहे.
परंतु लवकरच सदर मुद्दा हा युवा स्वाभिमान पक्षाचे सर्वसर्वा आमदार श्री. रवी राणा यांच्या माध्यमातून पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून यावर बैठकीच्या माध्यमातून तात्काळ मागण्या मान्य करून घेण्याकरिता प्रयत्न होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आता या उपोषणाकडे आपला आत्मविश्वास गमावून बसलेला कामगार कशा पद्धतीने पाहतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.