सौ.भारती तितरे राज्यस्तरीय नक्षत्र साहित्य गौरव पुरस्काराने सन्मानित.
एस.के.24 तास
गडचिरोली : नक्षत्राचं देणं काव्यमंच पुणे द्वारा देण्यात येणारा नक्षत्र साहित्य गौरव पुरस्कार चामोर्शी येथील कवयित्री सौ. भारती संजय तितरे यांना देण्यात आला आहे.
चामोर्शी निवासी सौ.भारती संजय तितरे ह्या व्यवसायाने शिक्षिका असून त्यांचे जीवनगाणे काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे. नक्षञाचं देणं काव्यमंच मुख्यालयाच्या वतीने देण्यात येणारा प्रस्तुत पुरस्कार गडचिरोली येथे झाडीबोली साहित्य मंडळाच्या विशेष सभेत प्रदान करण्यात आला. याप्रसंगी विचारपीठावर ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर,झाडीबोली साहित्य मंडळाचे जिल्हाप्रमुख डॉ.चंद्रकांत लेनगुरे,कवी प्रा.विनायक धानोरकर,गझलकार मिलिंद उमरे,कमलेश झाडे,संजीव बोरकर,उपेंद्र रोहणकर, वामनदादा गेडाम,कथाकार प्रमोद बोरसरे,जितेंद्र रायपुरे, पुरूषोत्तम ठाकरे,वर्षा पडघम,श्रीमती कोडापे,सौ.चौधरी आदींची उपस्थिती होती.
सौ.भारती तितरे या उत्तम कवयित्री असून त्यांनी आजवर अनेक काव्यलेखन स्पर्धेत सहभागी होऊन विविध पुरस्कार प्राप्त केले आहे. त्यांच्या या पुरस्काराबद्दल कवी अरुण झगडकर,लक्ष्मण खोब्रागडे, सौ. शशिकला गावतुरे,रामकृष्ण चनकापूरे,सौ.प्रभाताई चौथाले,रंजित समर्थ,गणेश खोब्रागडे आदींनी अभिनंदन केले आहे.