मॅजिक बस तर्फे समुदाय समन्वयकांचे लेग क्रिकेट स्पर्धा.

मॅजिक बस तर्फे समुदाय समन्वयकांचे लेग क्रिकेट स्पर्धा.

 

एस.के.24 तास


पवनी : मॅजिक बस इंडिया फाऊंडेशनच्या स्केल प्रकल्पाअंतर्गत पवनी तालुक्यातील समुदाय समन्वयक यांच्या लेग क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहाने चंद्रमनी बुद्ध विहार पवनी या ठिकाणी २५ डिसेंबर रोजी पार पडल्या.

   मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन स्केल प्रकल्प अंतर्गत गेल्या ३ वर्षापासून खेळाद्वारे शिक्षण, जीवन कौशल्य विकास हा उपक्रम राबवला जात आहे.या उपक्रम अंतर्गत भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात ७३ शाळांमधील ८००० मुलांसोबत वेगवेगळे उपक्रम स्केल या प्रकल्पाच्या माध्यमातून राबविले जातात. यासाठी प्रत्येक गावात एक समुदाय समन्वयक नेमले आहेत. ते यशस्वीरित्या शाळा, विद्यार्थी, समुदाय यांच्या सोबत कार्य करतात आणि म्हणून त्यांच्या केलेल्या कार्याची पावती या समुदाय समन्वयकांना देण्यात यावी, 

यासाठी ६२ समुदाय समन्वयाकसाठी  लेग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन  करण्यात आले.प्रथम व द्वितीय क्रमांक पटकविणार्या संघांना मेडल व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.या कार्यक्रमाप्रसंगी स्पर्धेच्या उद्घाटनास प्रमुख अतिथी म्हणून शैलेश मयुर सर मुख्याध्यापक संत जगनाडे विद्यालय तिर्री,विकास राऊत सर संस्थापक डॉ.आंबेडकर हायस्कूल पवनी,गजघाटे सर मुख्याध्यापक आमगांव,आणि तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक यांनी क्रिड़ा स्पर्धेचे उद्घाटन करून स्पर्धेला हिरवी झेंडी दखविली.हि स्पर्धा जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक मा.निकी सर,व पवनी तालुक्याचे तालुका प्रकल्प व्यवस्थापक विनोद शंभरकर यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आला.

स्पर्धेच्या यशस्वी करिता शाळा सहाय्यक अधिकारी मोनाली धुर्वे,वसंत पोटे,भूषण कोकुडे, प्रेरणा वानखेडे, लक्ष्मी बनकर यांनी  परिश्रम घेतले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !