आमदार होळीच्या घरावर मोर्चा काढू ; धनगर संघटनांचा इशारा.

आमदार होळीच्या घरावर मोर्चा काढू ; धनगर संघटनांचा इशारा.


सुरेश कन्नमवार!मुख्य संपादक!एस.के.24 तास


गडचिरोली : गडचिरोली - झाडे कुणबी व इतर जातींचा समावेश भटक्या जमाती क मध्ये करावा अशी मागणी गडचिरोलीचे आमदार डॉ देवराव होळी सतत करीत असल्याने याविरोधात आमदारांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा धनगर संघटनांनी दिला आहे.

झाडे कुणबी,झाडी, झाडया हे  गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात असून इतर मागास प्रवर्गात येतात मात्र या लोकांनी कुणबी हा शब्द वगळून फक्त झाडे ठेऊन भटक्या जमाती क चे प्रमाणपत्र मिळवीत नोकरी व सोयी सवलतीचा लाभ घेत आहेत.  त्यामुळे धनगर समाज आक्रमक झाला असून २६ डिसेंबर ला गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयावर न भूतो न भविष्यती असा मोर्चा काढून सरकारचे लक्ष वेधले आहे. 

मात्र गडचिरोलीचे आमदार डॉ.देवराव होळी यांनी झाडे कुणबी यांची बाजू घेत इतरही जातींना भटक्या जमाती क प्रवर्गात समावेश करण्याची भूमिका घेतली असल्याने धनगर समाज आणखी आक्रमक होत आहे.धनगर समाजावर अन्याय करणाऱ्या आमदार डॉ.होळी यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा धनगर समाज संघर्ष समितीचे नागपूर विभाग अध्यक्ष डॉ तुषार मर्लावार, जिल्हाध्यक्ष,लचमा सिर्गावार व इतर धनगर संघटनांनी दिला आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !