व्यवसायात नैपुण्य प्राप्तीसाठी कौशल्ये विकसित करा - अप्पर जिल्हाधिकारी धनाजी पाटील ★ शा.औ.प्र.संस्थेत जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनीचा समारोप.

 


व्यवसायात नैपुण्य प्राप्तीसाठी कौशल्ये विकसित करा -  अप्पर जिल्हाधिकारी धनाजी पाटील


 ★ शा.औ.प्र.संस्थेत जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनीचा समारोप.



एस.के.24 तास


 गडचिरोली : प्रशिक्षणार्थ्यांनी आवडीचा व्यवसाय निवड केल्यानंतर परिश्रमपूर्वक त्या विषयांत   व्यवसाय कौशल्ये विकसित केल्यास  तुम्हाला ज्ञानासोबत उपजीविकेचे उत्तम साधन प्राप्त होऊ शकेल,  असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांनी जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनीच्या उद्घाटनाप्रसंगी केले.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोलीच्या वतीने जिल्ह्यातील तालुकास्तरावर  विजेते  प्रशिक्षणार्थ्यांची माॅडेलची तंत्र प्रदर्शनी आयोजित करण्यात आली होती.  या तंत्र प्रदर्शनी च्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी वैभव बोंनगीरवार होते तर प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा,शासकीय तंत्रनिकेतन चे प्राचार्य डॉ.अतुल बोराडे,प्राचार्य चौधरी,प्राचार्य मात्रे , प्राचार्य लोणे,परिक्षक प्रा.उमाळे,प्रा.रामटेके, प्रभारी प्रबंधक प्रभाकर  बुल्ले आदींची उपस्थिती होती.  


    कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे प्राचार्य संतोष साळुंखे यांनी केले.याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. गिल्डा म्हणाले की ,जीवनात परिश्रम करण्यासाठी उत्तम गुणांची कास धरली पाहिजे .जिद्द, परिश्रम आणि अभ्यासात सातत्य यामुळे कुठलेही यश प्राप्त करता येते. सकारात्मक दृष्टीने आपण वाटचाल केली पाहिजे, असे ते म्हणालेप्राचार्य बोराडे म्हणाले की,औ.प्र.संस्थेतील प्रशिक्षण जास्त प्रात्यक्षिकांवर अवलंबून असल्याने प्रशिक्षणार्थ्यांची व्यवसाय कौशल्ये लवकर विकसित होतात. तसेच या विद्यार्थ्यांना पुढे उच्च शिक्षण घेण्याचा राजमार्ग मोकळा होतो. 


      समारोपीय कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी श्री. समाधान शेंडगे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. त्यांच्या हस्ते संस्थास्तर व जिल्हास्तरावर विजेत्या स्पर्धकांना गौरव चिन्ह व  प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. जिल्हास्तरावर अभियांत्रिकी गटात प्रथम पुरस्कार  औ.प्र. संस्था गडचिरोली येथील टूल अँड डाय मेकर च्या मॉडेल ला मिळाला,द्वितीय पुरस्कार औ.प्र . संस्था देसाईगंज च्या जोडारी व्यवसायाच्या मॉडेल ला प्राप्त झाला.तर  तृतीय पुरस्कार औ. प्र. संस्था चामोर्शीच्या  विजतंत्री विभागाच्या मॉडेलला प्राप्त मिळाला,तर अतांत्रिक गटातील प्रथम पुरस्कार शा.औ.प्र.संस्था गडचिरोलीच्या फॅशन टेक्नॉलॉजी व्यवसायाच्या नऊवारी डिझाईन ला मिळाला. संस्थेद्वारा जिल्हास्तरावर तंत्र प्रदर्शनीचे उत्तम आयोजन केल्याबद्दल उपजिल्हाधिकारी श्री. शेंडगे यांनी संस्थेचे कौतुक करून विजेत्या स्पर्धकांना शुभेच्छा दिल्यात. 


 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गटनिदेशक बंडोपंत बोढेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन गटनिदेशक आनंद मधुपवार यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गटनिदेशक केशव डाबरे, भास्कर मेश्राम,नितीन श्रीगिरीवार,श्रीकांत पुरम, सतिशचंद्र भरडकर, मुरारी घाटूरकर,उज्वल लेवडीवार,तुषार कोडापे,श्री.रोडगे ,सौ.गांगरेड्डीवार,सौ.वाळके,सौ.घोरमारे, कु,ताकसांडे,कु.कवाडकर,कु.मेश्राम  आदींनी परिश्रम घेतले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !