आरमोरी पोलिस स्टेशनचे ठाणेदार काळबांधे साहेब यांच्या कार्य कर्तृत्वाचा सत्कार.

आरमोरी पोलिस स्टेशनचे ठाणेदार काळबांधे साहेब यांच्या कार्य कर्तृत्वाचा सत्कार.


एस.के.24 तास


आरमोरी : गडचिरोली येथील पोलिस अधीक्षक कार्यालय अंतर्गत येणाऱ्या आरमोरी पोलिस स्टेशन या ठिकाणी रूजू झाले.मा.काळबांधे साहेब यांनी आपल्या रूजू दिनांकापासून आजपर्यंत विविध विधायक कार्य करून शासन, प्रशासन व लोक यांच्यातील सामाजिक दुवा म्हणून उत्कृष्ट कार्य करीत आहेत.


काळबांधे साहेब यांनी आरमोरी पोलिस स्टेशनचे प्रमुख या नात्याने कारभाराची सूत्रे हाती घेतल्यापासून आपल्या कार्याचा प्रभावशील दबदबा निर्माण करून परिसरातील सामान्यातील सामान्य माणसाला न्याय मिळायला सुरुवात झाली.काळबांधे साहेब हे अन्यायग्रस्त व आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांना सामाजिक तळमळीने व मानवतावादी दृष्टिकोनातून गरजवंताना स्वताच्या पदाचा अभिमान न बाळगता लोकांपर्यंत जाऊन त्यांच्या गंभीर व ज्वलंत समस्यांचे निराकरण करतात आणि काळबांधे साहेब हे लोकांच्या कल्याणासाठी व सामाजिक सलोखा राखण्यासाठी सतत प्रयत्न करणारा व जनमानसाठी आपले उत्कृष्ट कार्य करणारा खरा जनअधिकारीआहे अशी आरमोरी परिसरातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.


 या वर्षी अतिपावसामुळे मानवी जीवन अस्ताव्यस्त झाले आणि तसेच अतिवृष्टीमुळे मानवी प्रवासाचे व रहदारीचे रस्ते पूर्णपणे जीवघेणे ठरले असतांना मानवी करूणेचा झरा असणाऱ्या मनाच्या काळबांधे साहेब यांनी मानवतेची नि:स्वार्थ सेवा करण्यासाठी व गडचिरोली ते आरमोरी मार्गाचा सुखमय प्रवास होवो या उदात्त हेतूने आपल्या कर्मचारी व पोलीस बांधवासोबत श्रमदान करून आपल्या पोलिस विभागाचा मान वाढवीला.तसेच ते काम सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम असतांना सुध्दा त्या विभागाकडे बोट न दाखविता स्वतः हिरीरीने व अतिशय पोटतिडकीने रस्ता लोकांना जाण्यासाठी व येण्यासाठी योग्य तयार करून दिला.या त्यांच्या प्रशंसनीय व प्रेरणादायी कार्यामुळे ते राष्ट्र कार्याचे धनी ठरले आणि तसेच या सदाचारी,प्रेमळ,व प्रसन्न व्यक्तिमत्त्व असलेला महाराष्ट्र पोलीस विभागाचा उत्तुंग भरारी घेणारा, आपल्या संविधानीक कार्यावर (कर्तव्यावर) जिवापाड प्रेम करणाऱ्या कर्तव्यदक्ष अधिकारी काळबांधे साहेब यांचे नाव लोकांच्या हृदयाच्या कप्प्यात व मना मनात कोरलेले दिसून येते.

या प्रामाणिक,सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या व आपल्या कर्तव्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या काळबांधे साहेब यांचा डॉ नामदेव वसंताबाई भिकाजी खोब्रागडे विदर्भ अध्यक्ष बहुजन अंसटीत कामगार आघाडी संघ गडचिरोली यांच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.या प्रसंगी मा.रामटेके जिल्हा अध्यक्ष पर्यावरण व मानव अधिकार संरक्षण संघटना गडचिरोली आदि उपस्थित होते.महाराष्ट् शासनाने व गृहमंत्री यांनी गडचिरोली सारख्या दुर्गम भागात प्रामाणिक व कार्यक्षम सेवा देणाऱ्या अधिकारी यांची माहिती गोळा करून त्यांना जिल्हा ठिकाणी व पदोन्नती देऊन त्यांच्या प्रशंसनीय कार्याचा गौरव करावा.

काळबांधे साहेब यांच्या हातून भविष्यात प्रशंसनीय राष्ट्रीय सेवा घडो अशा मंगलमय शुभेच्छा देण्यात आल्या.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !