नव वर्ष धुंदीत नव्हे,शुध्दीत साजरे करा...
एस.के.24 तास
गडचिरोली : समाजामध्ये वाढत चाललेली व्यसनाधीनता खूपच भयानक रूप धारण करित असल्याचे दिसून येते आहे.यामध्ये प्रामुख्याने युवकांचे प्रमाण खूपच आहे.उद्याच्या पिढीला आरोग्य संपन्न सदृढ व व्यसनमुक्त ठेवून शक्तीशाली राष्ट्र घडविण्याचे आपले सर्वांचे कर्तव्य आहे.नविन वर्षाची सुरुवात आपल्या संस्कृतीनुसार आपण आनंदाने, उत्साहाने आणि वर्षाचा संकल्प ठेवून करित असतो.
परंतु ३१ डिसेंबर या दिवशी अनेक तरुण स्वत: च्या सुंदर आरोग्यमय जिवनाला काळीमा फासतात .ईतकेच नव्हे तर वर्षाच्या अखेरचा दिवस व्यसनामुळे अनेकांच्या अनमोल जिवनाचाही अखेरचा ठरतो.३१ डिसेंबर या दिवशी अनेक जण व्यसन करणारे व पहिल्यांदाच व्यसन चाखणारे असतात म्हणून नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, जिल्हा शाखा गडचिरोली च्या वतिने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून नव वर्ष धुंदीत नव्हे, तर शुध्दीत साजरे करा असे आवाहन गडचिरोलीच्या जनतेला करण्यात येत आहे.
आपला नम्र... संदिप कटकुरवार जिल्हा संघटक,नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य जिल्हा,शाखा गडचिरोली