★ महिला सरपंचास मारहाण.
एस.के.24 तास
मुल : चांदापूर येथील सरपंचा,सोनूताई कालिदास देशमुख यांना मारहाण केल्याप्रकरणी चांदापूर ग्रामपंचायतचे उपसरपंच,अशोक मार्कंडी मार्गनवार यांचे वर मूल पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ मजली आहे.
चंद्रपूरच्या सरपंच सोनूताई देशमुख यांच्या तक्रारीवरून मूल पोलिसांनी अशोक मार्गनवार यांचे विरोधात गुन्हे दाखल केले आहे.
श्रीमती देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक २३ डिसेंबर रोजी ११ वाजता ग्रामपंचायत ची मासिक सभा होती.मासीक सभेला 7 सदस्य उपस्थित होते. विषय क्रमांक 8 नुसार विद्युत साहित्य दर पत्र चालु असतांना उपसरपंच मार्गनवार निषकारण दुसरेच मुद्दे सभेतच मांडुन भांडु लागला.मी मासीक सभेची अध्यक्ष पदी असतांना गैरअर्जदार याने सभेतच माझे हात पकडुन उजव्या हाताची बाजू पकडून,गालावर थापड मारली व मारहान केली.
त्यामुळे बांगडीचे काचगडुन माझ्या हाता दाखल दुखापत झाली. सदर गैरअर्जदार अशोक मार्गनवार उपसरपंच हा येवढ्यावरच थांबला नाही,मला शिव्या देवुन मला मारण्याची धमकी दिली.व पोलीस स्टेशन मध्ये गेलीस तरी काहीही करू शकत नाही असे म्हणालाा.शब्दात शिवीगाळ केली.तु समजतेस काय तेे मी पाहुन घेईन. अशी धमकी दिली.